सचिन अहिर चषक शालेय कॅरम स्पर्धेत अमेय, समीर, शिवांशची विजयी सलामी

आयडियल स्पोर्ट्स अ‍ॅकॅडमीतर्फे राष्ट्रीय मिल मजदूर संघ सहकार्याने आमदार सचिन अहिर चषक शालेय कॅरम स्पर्धेत पार्ले टिळक विद्यालयाचा अमेय जंगम व सार्थक केरकर, एसव्हीएस इंग्लिश स्कूलचा समीर कांबळे, पाटकर विद्यालय-डोंबिवलीचा गौरांग मांजरेकर व शिवांश मोरे यांनी सलामीचे सामने जिंकले. परळ येथील आरएमएमएस सभागृहामध्ये डावाच्या मध्यापर्यंत 8-0 अशी आघाडी घेणाऱ्या महात्मा गांधी विद्यालय-वांद्रेची राष्ट्रीय ख्यातीची सबज्युनियर कॅरमपटू तनया दळवीला अमेय जंगमने 11-8 असे चकविले. स्पर्धेचे उद्घाटन माजी नगरसेवक सुनील अहिर, संघाचे पदाधिकारी निवृत्ती देसाई, बजरंग चव्हाण, सुनील बोरकर, राजन लाड, शिवाजी काळे, संयोजक लीलाधर चव्हाण आदींच्या प्रमुख उपस्थितीत झाले.

Comments are closed.