अॅमेझॉन 14 हजार कर्मचाऱ्यांना काढणार

ई–वाणिज्य अॅमेझॉन कंपनीने 2025 मध्ये तब्बल 14 हजार कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्याची तयारी सुरू केली आहे. कर्मचारी कपात केल्यानंतर कंपनी वार्षिक आधारावर 2.1 बिलियन ते 3.6 बिलियन डॉलरपर्यंत अतिरिक्त बचत करता येईल. कंपनीचे जगभरातील कार्यालयातील मॅनेजमेंट वर्कपर्ह्स 13 टक्क्यांपर्यंत कमी केले जाणार आहे.
अॅमेझॉनमधील मॅनेजर्सची संख्या यानंतर 1,05,770 वरून थेट 91,936 इतकी होईल. अॅमेझॉनने याआधीही कम्युनिकेशन्स आणि सस्टेनिबिलिटी युनिटमधूनही कर्मचारी कपात करण्यात आली होती. टेक्नोलॉजी आणि रिटेल सेक्टरच्या दिग्गज पंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजेन्सच्या आव्हानांचा सामना व पंपन्यांचा नफा राखण्यासाठी पंपन्या कर्मचारी कपात करत आहेत. अॅमेझॉन आगामी काळात आपल्या मॅनेजमेंट वर्कफोर्समधील 13 हजार 834 म्हणजेच जवळपास 14 हजार कर्मचारी कपात करणार आहे.
Comments are closed.