मूल नको! अमेरिकेत जन्म दर घटला; मिलेनियल्स आणि जेन झेडची मानसिकता

अमेरिकेसारख्या प्रगत राष्ट्राची लोकसंख्या कमी होत आहे. अमेरिकेत 2023मध्ये 35 लाख 96 हजार 017 बाळांचा जन्म झाला. अमेरिकेतील मागील 40 वर्षांतील हा निचांक आहे. यावरून असे दिसतंय की, मिलेनियल्स आणि जेन झेडच्या पिढीने बाळाचा विचार लांबणीवर टाकलेला दिसतो
नॅशनल सेंटर फॉर हेल्थ स्टॅटिस्टिकने (एनएसीएचएस) जन्म प्रमाणपत्राच्या डेटावर आधारित एक अहवाल नुकताच जारी आहे. त्या अहवालानुसार अमेरिकेत प्रजनन दर कमी झाल्याचे दिसून येतंय. 2023 मध्ये अमेरिकेतील प्रजनन दर 3टक्क्यांनी कमी झाल्याचे अहवालातून दिसून येतंय. 15 ते 44 वर्षे वयोगटातील दर एक हजार महिलांमागे 54.5 बाळांचा जन्म कमी झाला आहे. 2022 पेक्षा दोन टक्क्यांनी जन्मदरात घट आहे. मात्र 30 ते 40 वयोगटातील महिलांचा प्रजनन दर स्थिर आढळून आलाय.
पहिलं बाळ जन्माला घालण्याचे अमेरिकन महिलेचे सरासरी वय 27.5 एवढे आढळून आलंय. आतापर्यंतचे अमेरिकेतील सर्वाधिक वय आहे.
जगभरातील देशांमध्ये प्रामुख्याने श्रीमंत देशांमध्ये मुलं जन्माला घालण्याचे प्रमाण कमी होत आहे. आर्थिक अस्थिरता, उशीरा मातृत्व ही त्यामागील काही कारणे आहेत. हे प्रमुख कारण आहे. अमेरिकेत 2207-2009 मध्ये मंदी होती. तेव्हापासून प्रसूतींचे प्रमाण घटले आहे. देशाची अर्थव्यवस्था गतिमान झाली तरी बाळाला जन्म देण्याच्या मानसिकतेत फारसा बदल झाला नाही. 1981 ते 1996 मध्ये ( मिलेनियल्स) आणि 1995- 2012 (जेन झेड) जन्माला आलेल्या पिढीला कौटुंबिक व्यवस्थेत स्वारस्य नसल्याचे दिसत आहे.
Comments are closed.