आयपीएल इतिहासातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज, पर्पल कॅप विजेत्यांची संपूर्ण यादी!
आयपीएलच्या इतिहासात पर्पल कॅप हा पुरस्कार दरवर्षी सर्वाधिक बळी घेणाऱ्या गोलंदाजाला दिला जातो. 2008 साली सुरू झालेल्या या लीगमध्ये आतापर्यंत 17 हंगाम पूर्ण झाले आहेत, ज्यामध्ये 13 वेगवेगळ्या खेळाडूंना पर्पल कॅप मिळाली आहे. ड्वेन ब्राव्हो, भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोनदा हा सन्मान मिळवला आहे.
आयपीएलमध्ये आतापर्यंतचे पर्पल कॅप विजेते:
2008: सोहेल तन्वीर (राजस्थान रॉयल्स)
२०० :: आरपी सिंग (डेक्कन चार्जर्स)
2010: प्रग्यान ओझा (डेक्कन चार्जर्स) –
२०११: लसिथ मालिंगा (मुंबई इंडियन्स)
2012: मॉर्ने मॉर्केल (दिल्ली डेअरडेव्हिल्स)
2013: ड्वेन ब्राव्हो (चेन्नई सुपर किंग्ज)
2014: मोहित शर्मा (चेन्नई सुपर किंग्ज)
2015: ड्वेन ब्राव्हो (चेन्नई सुपर किंग्ज)
2016: भुवनेश्वर कुमार (सनरायझर्स हैदराबाद)
2017: भुवनेश्वर कुमार (सनरायझर्स हैदराबाद)
2018: अँड्र्यू टाय (किंग्ज इलेव्हन पंजाब)
2019: इम्रान ताहिर (चेन्नई सुपर किंग्ज)
2020: कागिसो रबाडा (डेली कपिट्स).
2021: हर्षल पटेल (रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू)
2022: युझवेंद्र चहल (राजस्थान रॉयल्स)
2023: मोहम्मद शमी (गुजरात टायटन्स)
2024: हर्षल पटेल (पंजाब किंग्ज)
गेल्या हंगामात हर्षल पटेलने पंजाब किंग्जकडून खेळताना 14 सामन्यांत 24 बळी घेतले आणि पर्पल कॅप मिळवली.
आयपीएलच्या इतिहासात ड्वेन ब्राव्हो, भुवनेश्वर कुमार आणि हर्षल पटेल यांनी प्रत्येकी दोनदा पर्पल कॅप जिंकली आहे. ब्राव्होने 2013आणि 2015 मध्ये चेन्नई सुपर किंग्जकडून खेळताना हा सन्मान मिळवला, तर भुवनेश्वर कुमारने 2016 आणि 2017 मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून खेळताना पर्पल कॅप मिळवली. तर हर्षल पटेलने 2021 आणि 2024 मध्ये सर्वाधिक विकेट्स घेतल्या.
पर्पल कॅप हा पुरस्कार गोलंदाजांच्या सातत्यपूर्ण कामगिरीचे प्रतीक आहे, आयपीएलमधील गोलंदाजांसाठी हा एक प्रतिष्ठेचा सन्मान मानला जातो. दरवर्षी गोलंदाज या पुरस्कारासाठी स्पर्धा करतात आणि त्यांच्या उत्कृष्ट कामगिरीने संघाच्या यशात योगदान देतात.
Comments are closed.