Nagpur Voilence – महिला पोलिसाचा विनयभंग, माथेफिरूंनी खेचली वर्दी; अश्लील शेरेबाजीही केली

नागपूरमध्ये सोमवारी रात्री झालेल्या हिंसाचारादरम्यान पोलिसांवर झालेल्या हल्ल्यात 33 पोलीस जखमी झाले त्यात तीन डिसीपींचाही समावेश आहे. या सगळ्यात आता आणखीही एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. ही दंगल सुरू असताना काही समाजकंटकांनी महिला पोलिसाचा विनयभंग केला आहे. त्यांनी त्या महिला पोलिसाची वर्दी खेचली, शिवीगाळ व अश्लील शेरेबाजीही केली. याप्रकरणी नागपूरच्या गणेश पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Comments are closed.