नगरच्या व्यापाऱ्याचा दहा कोटी रूपयांच्या खंडणीसाठी खून; ज्याला वसुलीचं काम दिलं त्यानेच कारमध्य
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">अहिल्यानगर: अहिल्यानगरमधून बेपत्ता असलेल्या व्यापाराचा मृतदेह नालीमध्ये सापडल्याने शहरात एकच खळबळ उडाली. दीपक परदेशी असे व्यापाऱ्याचे नाव असून परदेशी हे 21 दिवसापासून बेपत्ता होते. दीपक परदेशी यांचे अपहरण करून खून केल्याचे निष्पन्न झालं आहे. नगर मनमाड रोडवरील निंबळक बायपास जवळ नालीमध्ये दीपक परदेशी यांचा मृतदेह सापडला आहे. दीपक परदेशी यांचा जीव दहा कोटींच्या खंडणीसाठी घेतला गेला असल्याची माहिती समोर आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, दहा कोटींच्या खंडणीसाठी धावत्या कारमध्ये नायलॉन दोरीने गळा आवळून व्यापाऱ्याचा खून केला, त्यानंतर त्यांचा मृतदेह रस्त्यालगतच्या नालीमध्ये फेकल्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी (दि. 17) रात्री उघडकीस आला. दीपक लालसिंग परदेशी (68, रा. परदेशी मळा, बोल्हेगाव) असे खून झालेल्या व्यापाऱ्याचे नाव असून, ते 24 फेब्रुवारीपासून बेपत्ता होते. पोलिसांकडून देखील त्यांचा शोध घेण्यात येत होता, त्यानंतर आता त्यांचं अपहरण करून खून केल्याचं समोर आलं आहे. या प्रकरणी पोलिसांनी दोघांना ताब्यात घेऊन चौकशी सुरू केली होती.
या प्रकरणी पोलिसांनी दोघांना अटक केली आहे. किरण कोळपे (38) व सागर गीताराम मोरे (28) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत.मृत दीपक परदेशी यांचे तेलाचे दुकान आहे. त्यांचे विळद गावातील काही लोकांकडे पैसे होते. ही वसुली करण्याचे काम त्यांनी आरोपींना दिलेले होतं. मात्र, पैसे वसूल करता आले नाहीत, म्हणून त्यांनी काम दिलेल्या दीपक परदेशी यांनाच उचलून त्यांच्याकडून पैसे वसूल करण्याचा कट रचला. 24 फेब्रुवारी रोजी दुपारी दोन्ही आरोपी परदेशी यांच्या घरी आले. त्यांनी परदेशी यांना कारमध्ये बसवलं. कोळपे याने त्यांच्याकडे दहा कोटी रुपये मागितले. दीपक परदेशी यांनी आरोपींना पैसे देण्यास नकार दिल्याने मोरे याने परदेशी यांचे हात घट्ट पकडले. त्यानंतर त्यांचा नायलॉन दोरीने गळा आवळला, आणि त्यांचा जीव घेतला.
सीसीटीव्ही फुटेजमधील कारमुळे लागला छडा
पोलिसांनी दीपक परदेशी यांच्या घरापासून जाणाऱ्या रस्त्याचे सर्व सीसीटीव्ही फुटेज तपासले, या सीसीटीव्ही फुटेज पांढऱ्या रंगाची कार जाताना दिसली. ही कार दोन ठिकाणी सीसीटीव्हीमध्ये दिसल्यामुळे पोलिसांना संशय आला. पोलिसांनी ही कार कोणाची आहे, याचा शोध घेतला असता ती आरोपी किरण कोळपे याची असल्याची माहिती समोर आली, त्यानंतर चौकशीमध्ये सर्व माहिती समोर आली आहे. एमआयडीसी जवळील निंबळक बायपास रस्त्यावरती असलेल्या एका नाल्यामध्ये कुजलेल्या अवस्थेत दीपक परदेशी यांचा मृतदेह सापडला.
बेपत्ता झाल्याची तक्रार
दरम्यान दीपक परदेशी बेपत्ता असल्याची तक्रार त्याच्या कुटूंबातील व्यक्तींंनी 25 फेब्रुवारी रोजी तोफखाना पोलिस ठाण्यात दिली होती. पोलिसांनी तपास देखील केला. परंतु, परदेशी यांची कोणतीही माहिती मिळाली नाही. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने कोळपे याला अटक केल्यानंतर त्याने मृतदेह दाखवला.
कोळपे बडतर्फ पोलिस
या प्रकरणातील आरोपी किरण कोळपे हा पोलिस खात्यामध्ये होता. त्याच्यावर गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असून, त्याला बडतर्फ करण्यात आलेले आहे. त्यानेच दीपक परदेशी यांच्या खुनाचा कट रचला होता.
Comments are closed.