Pune News भररस्त्यात टेम्पो ट्रॅव्हलरने पेट घेतला, आगीत होरपळून चार प्रवाशांचा मृत्यू

पुण्यातील हिंजवडी येथे व्योमा ग्राफिक्स कंपनीच्या कर्मचाऱ्यांना घेऊन जाणाऱ्या एका टेम्पो ट्रॅव्हरलरला अचानक आग लागली. या आगीत होरपळून चार प्रवासांचा मृत्यू झाला. ही घटना घडली तेव्हा गाडीत बारा कर्मचारी प्रवास करत होते.या घटनेतील जखमींना रुबी हॉल क्लिनिक हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे.

व्योमा ग्राफिक्स कंपनीचे एकूण 12 कर्मचारी या टेम्पो ट्रॅव्हलरने प्रवास करत होते. त्यावेळी हिंजवडी फेज वनमध्ये चालकाच्या पायाखाली आग लागली व अचानक मोठ्या प्रमाणात पसरली. त्यावेळी चालक आणि पुढचे कर्मचारी तातडीनं खाली उतरले. मात्र, मागचे दार न उघडल्याने ही भयंकर घटना घडली.

Comments are closed.