शहापुरातील आदिवासींचा खर्डीत ‘बि-हाड मोर्चा’ रणरणत्या उन्हात 6 किमी पायी धडक

सुविधांसह वन दावे मंजूर करून वनपट्टे देण्यात यावेत, दहिगाव ते बेलनाला रस्त्यावरील पूल, मोऱ्या व साकाव टाकून रस्त्याचे काम करावे यासह विविध मागण्यांसाठी शहापूर तालुक्यातील आदिवासींनी खर्डीत बिऱ्हाड मोर्चा काढला. रणरणत्या उन्हात सहा किमी पायपीट करून खर्डी वन्यजीव कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे. जोपर्यंत ठोस लेखी आश्वासन मिळत नाही तोवर कार्यालयासमोरून हटणार नाही, असा पवित्रा आंदोलकांनी घेतला आहे.
वनविभागाच्या जागेत राहत असलेल्या कुटुंबांमुळेच आज वनविभागातील झाडे व वनराई राखली जात असूनही वनविभाग मात्र आदिवासींना त्रास देत आहे. वन दाव्यातील जागेसंदर्भात कायद्याच्या अडचणी दाखवून सोयीसुविधा देण्यास अडथळा आणला जात आहे. त्यामुळे आदिवासी बांधवांमध्ये संताप आहे. त्यामुळे कम्युनिस्ट पक्ष, किसान सभा, जनवादी महिला संघटना, लोकशाही युवा महासंघ, स्टुडंट फेडरेशन ऑफ इंडिया, सिटू व आदिवासी अधिकार राष्ट्रीय मंच यांच्या नेतृत्वाखाली मोर्चा काढला.
रात्रभर मुक्काम
दहिगावपासून खर्डी येथील वन्यजीव विभागाच्या कार्यालयावर दुपारी 12 वाजता 6 किमी पायी प्रवास करत बिऱ्हाड मोर्चा काढण्यात आला. शहापूरचे उपवनसंरक्षक दत्तात्रय मिसाळ यांनी प्रश्न सोडवण्याचे आश्वासन दिले. मात्र लेखी आश्वासन दिल्याशिवाय येथून हलणार नसल्याचे कृष्णा भवर व विजय विशे यांनी सांगितले.
Comments are closed.