‘मी त्याला बसच्या बाहेर काढलं’, मृत्यूच्या चार वर्षांपूर्वी शेन वॉर्नचे इंडियन खेळाडूबाबत भाष्य

शेन वॉर्न आणि रवींद्र जडेजा: ऑस्ट्रेलियाचा दिवंगत क्रिकेटपटू आणि जगभरात फिरकीचा जादूगार म्हणून ओळख असलेल्या शेन वॉर्नला कोण ओळखत नाही. क्रिकेटच्या मैदानावर शेन वॉर्नने फिरकीच्या जोरावर भल्याभल्या दिग्गज फलंदाजांना नाचवलं होतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये छाप सोडणारा शेन वॉर्न इंडियन प्रिमिअर लीगमध्ये देखील चांगली कामगिरी करताना पाहायला मिळाला होता. आयपीएलला 2008 मध्ये सुरुवात झाली. यावेळी आयपीएलच्या पहिल्या हंगामातच शेन वॉर्नच्या नेतृत्वाखालील राजस्थान रॉयल्सने ट्रॉफी मिळवली होती. मात्र, त्यानंतर आजपर्यंत कधीही राजस्थान रॉयल्सला आयपीएलची ट्रॉफी जिंकता आली नाही. दरम्यान, राजस्थान रॉयल्सचं नेतृत्व करत असताना आलेले अनुभव शेन वॉर्नने त्याच्या आत्मचरित्रात लिहिले आहेत. त्यामध्ये एका भारतीय क्रिकेटपटूचा खास उल्लेख केलाय. ‘My story, without the spin’, असं शेन वॉर्नच्या आत्मचरित्राचं नाव आहे.

भारतीय क्रिकेटपटू रवींद्र जाडेजा हे आता आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये देखील मोठं नाव बनलंय. मोठ्या संघर्षानंतर रवींद्र जाडेजाला क्रिकेटमध्ये यश मिळालं. दरम्यान, रवींद्र जाडेजाला प्रोत्साहन देणाऱ्या आणि त्याला परिपक्व बनवणाऱ्या लोकांमध्ये शेन वॉर्नचा देखील समावेश आहे. रवींद्र जाडेजाला शिस्तीचे धडे शेन वॉर्ननेच दिले होते.

शेन वॉर्नने ‘My story, without the spin’ या त्याच्या आत्मचरित्रात रवींद्र जाडेजाचं खूप कौतुक केलंय. शेन वॉर्न लिहितो, रवींद्र जाडेजा फार उत्साही आहे. मात्र, त्याला शिस्त नव्हती. त्याला शिस्त नसणे हे आमच्या टीमची मोठी समस्या बनली होती. युवा खेळाडूंना शिस्त नसणे हे चुकीच्या मार्गावर घेऊन जाते. आम्ही त्याच्या काही गोष्टी दुर्लक्ष केल्या. मात्र, कोणत्याही बाबतीत उशीर करणाऱ्या व्यक्तीला आम्ही सहन करु शकत नव्हतो.

रवींद्र जाडेजाला बसमधून खाली उतरवलं

शेन वॉर्न पुढे लिहितो, “रवींद्र जाडेजा नेहमी उशीरा यायचा. सुरुवातील बॅग आणि साहित्य असल्याने मी त्याच्याकडे दुर्लक्ष केले. मात्र, दुसऱ्यावेळी आम्ही बसमधून सकाळी 9 वाजता रवाना झालो होतो. तेव्हा तो बसमध्ये नव्हता. त्यामुळे त्याला स्वत:ला मैदानावर यावं लागलं आणि त्यामुळे पुन्हा उशीर झाला. ट्रेनिंगनंतर परत येत असताना मी मध्येच बस थांबवली आणि म्हणालो मित्रांनो आज सकाळी कोणी उशीरा आले? रवी मित्रा खाली उतर आणि चालत हॉटेलकडे ये…मात्र, त्यांच्या एका मित्राने गोंधळ घातला. त्यालाही मी बसच्या बाहेर काढले. मात्र, त्यानंतर कोणीही कधी उशीरा आले नाही.”

इतर महत्त्वाच्या बातम्या

10 कर्णधारांमध्ये सगळ्यात सिनियर, पण सगळ्यात ‘गरीब’, रहाणेला दीड कोटी, पाटीदार 11 कोटी, टॉपवरील पंतला किती सॅलरी?

अधिक पाहा..

Comments are closed.