फिरकीचा जादूगार! IPLच्या इतिहासात अमित मिश्राचा 'हा' पराक्रम आजही अभेद्य

आयपीएलमध्ये हॅट्ट्रिक घेणे ही अत्यंत दुर्मिळ कामगिरी मानली जाते. या स्पर्धेच्या इतिहासात अनेक दिग्गजांनी ही कामगिरी नोंदवली असली, तरी फिरकी गोलंदाज अमित मिश्राने सर्वाधिक तीन हॅट्ट्रिक घेत एक नवा विक्रम प्रस्थापित केला आहे. त्याची ही कामगिरी आयपीएलच्या इतिहासात सुवर्णाक्षरांनी नोंदवली गेली आहे. हा आयपीएलमधील सर्वात प्रभावी फिरकी गोलंदाजांपैकी एक आहे.

अमित मिश्राने 2008 मध्ये दिल्ली डेअरडेव्हिल्स (आता दिल्ली कॅपिटल्स) संघाकडून खेळताना डेक्कन चार्जर्सविरुद्ध पहिली हॅट्ट्रिक घेतली. त्यानंतर 2011 मध्ये डेक्कन चार्जर्स संघाकडून खेळताना किंग्ज इलेव्हन पंजाब (आता पंजाब किंग्ज) विरुद्ध त्याने दुसरी हॅट्ट्रिक नोंदवली. 2013 मध्ये सनरायझर्स हैदराबाद संघाचे प्रतिनिधित्व करताना पुणे वॉरियर्स इंडियाविरुद्ध त्याने तिसरी आणि विक्रमी हॅट्ट्रिक घेतली. आयपीएलसारख्या स्पर्धेत हॅट्ट्रिक घेणे अत्यंत कठीण आणि उल्लेखनीय आहे.

अमित मिश्रा व्यतीरिक्त युवराज सिंगनं हा पराक्रम एकापेक्षा जास्त वेळा केला आहे. 2009 मध्ये युवराज सिंगने दोन हॅट्रिक घेतल्या. त्याने किंग्ज इलेव्हन पंजाबकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू आणि डेक्कन चार्जर्सविरुद्ध खेळताना दोन हॅट्रिक घेतल्या. रोहित शर्मानेही 2009 मध्ये हॅट्ट्रिक घेतली होती. आयपीएलमध्ये हॅटट्रिक घेणे ही एक मोठी कामगिरी आहे. अमित मिश्राच्या या विक्रमामुळे आयपीएलमध्ये फिरकी गोलंदाजांचे महत्त्व अधोरेखित होते. त्याची ही कामगिरी युवा फिरकी गोलंदाजांसाठी प्रेरणादायी ठरली आहे. त्यांच्या या विक्रमामुळे आयपीएलच्या इतिहासात त्याचे नाव कायमचे कोरले गेले आहे, आणि त्याच्या कामगिरीमुळे युवा फिरकी गोलंदाजांना प्रेरणा मिळाली आहे.

Comments are closed.