IPL 2025 – पहिल्या लढतीला हार्दिक पंड्या मुकणार, रोहित नाही तर ‘हा’ खेळाडू मुंबईची धुरा सांभाळणार

इंडियन प्रीमियर लीगच्या आगामी हंगामाला 22 मार्च पासून सुरुवात होत आहे. स्पर्धेतील पहिला सामना कोलकाता नाईट रायडर्स आणि रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू संघात ईडन गार्डन्स मैदानावर रंगणार आहे. तर पाच वेळच्या विजेत्या मुंबईचा सामना 23 मार्च रोजी चेन्नई सुपर किंग्ज विरुद्ध होणार आहे. या लढतीत हार्दिक पंड्या खेळणार नसल्याने मुंबईचे नेतृत्व कोण करणार हा प्रश्न उभा ठाकला होता.
सुरुवातीला मुंबईचे नेतृत्व रोहित शर्मा करणार अशी चर्चा होती, मात्र आता ही चर्चा निरर्थक असल्याचे सिद्ध झाले आहे. बुधवारी मुंबई इंडियन्स संघाची पत्रकार परिषद पार पडली. यात मुंबईचा कोच महेला जयवर्धने आणि कॅप्टन हार्दिक पंड्या यांनी पहिल्या लढतीत कोण नेतृत्व करणार याचे उत्तर दिले आहे. पंड्या याच्या अनुपस्थित सूर्यकुमार यादव हा मुंबईचे नेतृत्व करणार असल्याचे स्वतः हार्दिक आणि महेला जयवर्धने यांनी स्पष्ट केले.
याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे तो यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्याला मुकणार आहे. याबाबत विचारले असता तो म्हणाला की हे माझ्या नियंत्रणा बाहेर असून एक ते दीड मिनिट उशीर झाल्याने मला दंड ठोठावण्यात आला. अर्थात हा निर्णय माझ्या हातात नव्हता. माझ्या अनुपस्थितीमध्ये सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेल. त्याच्याकडे टीम इंडियाच्या टी-20 संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे.
IPL 2025 – पहिल्या लढतीला हार्दिक पंड्या मुकणार, रोहित नाही तर ‘हा’ खेळाडू मुंबईची धुरा सांभाळणार
गेल्या हंगामात स्लो ओव्हर रेटमुळे हार्दिक पंड्या याच्यावर एका सामन्याची बंदी घालण्यात आली होती. त्यामुळे तो यंदाच्या हंगामातील पहिल्या सामन्याला मुकणार आहे. याबाबत विचारले असता तो म्हणाला की हे माझ्या नियंत्रणा बाहेर असून एक ते दीड मिनिट उशीर झाल्याने मला दंड ठोठावण्यात आला. अर्थात हा निर्णय माझ्या हातात नव्हता. माझ्या अनुपस्थितीमध्ये सूर्यकुमार यादव मुंबई इंडियन्सचे नेतृत्व करेल. त्याच्याकडे टीम इंडियाच्या टी-20 संघाचे नेतृत्व करण्याचा अनुभव आहे.
Comments are closed.