ते आपल्यात भांडणे लावत स्वार्थ साधत आहेत; अदानीकडून UDF वाढवण्यावर आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल

मुंबई विमानतळावरून उड्डाण करणे आता महागणार आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाच्या विकासाबाबत, विमानतळ व्यवस्थापनाने प्रवाशांकडून वापरकर्ता विकास शुल्क (UDF) वसूल करण्याचा प्रस्ताव तयार केला आहे. यानुसार देशांतर्गत प्रवासासाठी 325 रुपये आणि आंतरराष्ट्रीय प्रवासासाठी 650 रुपये आकारले जातील. या वृत्तावरून शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते, युवासेनाप्रमुख आदित्य ठाकरे यांनी हल्लाबोल केला आहे. ते आपल्यात भांडणे लावत स्वार्थ साधत आहेत, असे आदित्य ठाकरे यांनी म्हटले आहे.

अदानी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडची उपकंपनी आणि छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे संचालक मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्ट लिमिटेडने मंगळवारी सांगितले की प्रवाशांच्या सुविधा वाढवण्यासाठी हा निर्णय घेण्यात आला आहे. सध्या हा प्रस्ताव विमानतळ आर्थिक नियामक प्राधिकरणाकडे सादर करण्यात आला आहे. विमानतळ व्यवस्थापनाने सांगितले की, एकीकडे यूडीएफ वसूल केला जाईल आणि दुसरीकडे विमान लँडिंग आणि पार्किंग शुल्कात सुमारे 35 टक्के कपात केली जाईल.

मुंबई विमानतळावर सध्याचा प्रति प्रवासी नफा 285 रुपये आहे. या प्रस्तावात तो 332 रुपयांपर्यंत वाढवण्याचे उद्दिष्ट आहे. मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ लिमिटेडने सांगितले की, पुढील पाच वर्षांत विमानतळाच्या पायाभूत सुविधांच्या बांधकामासाठी 10,000 कोटी रुपये गुंतवले जातील. अंदाजे 229 दशलक्ष प्रवाशांपासून एकूण 7,600 कोटी रुपयांचे उत्पन्न मिळेल.

याबाबत आदित्य ठाकरे यांनी इंस्टाग्रामवर एक स्टोरी शेअर केली आहे. त्यात म्हटले आहे की, ते आपल्या सर्वांना इतिहासाशी भांडण्यात गुंतवून ठेवतात आणि ते त्यांचे भविष्य सुरक्षित करत आहेत. अदानी संचालित मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाने देशांतर्गत आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी नवीन वापरकर्ता विकास शुल्क (UDF) प्रस्तावित केल्यामुळे मुंबई विमानतळावरून उड्डाण करणे महाग होऊ शकते. MIAL ने देशांतर्गत प्रवाशांसाठी ₹ 325 UDF आणि आंतरराष्ट्रीय प्रवाशांसाठी अतिरिक्त ₹ 463 सुचवले आहे. आपल्याला भांडणात गुंतवून ते त्यांचा स्वार्थ साधत आहेत, असा हल्लाबोल आदित्य ठाकरे यांनी केला.

Comments are closed.