दक्षिण मुंबईत रंगणार गिरगाव चॅम्पियन्स लीगचा थरार, आदित्य ठाकरे करणार युवासेना कार्यकारिणी संघाचे नेतृत्व

संपूर्ण दक्षिण मुंबईत आणि गिरगावमध्ये सध्या जीसीएल म्हणजे गिरगाव चॅम्पियन्स लीगची चर्चा सुरू झाली आहे. गिरगाव बॉईज व युवा व्हिजनने स्पर्धेची जोरदार तयारी केली आहे. दक्षिण मुंबईचे दिवंगत विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू झालेल्या जीसीएलच्या दुसऱ्या मोसमाचे 22 आणि 23 मार्चला इस्लाम जिमखान्यावर भव्य आणि दिव्य आयोजन युवासेना उपसचिव प्रथमेश सकपाळ यांनी केले आहे. या स्पर्धेला टेनिस क्रिकेटसह मुंबई संघाचे रणजीपटू व हिंदुस्थानी संघाचे माजी क्रिकेटपटूदेखील आवर्जून उपस्थित राहणार आहेत.

या दिमाखदार आणि धुवांधार स्पर्धेच्या उद्घाटनीय सामन्यात शिवसेना नेते, आमदार, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे हे युवासेना कार्यकारिणी संघाचे नेतृत्व करणार असून ते डिजिटल मीडिया संघाशी भिडतील. तसेच एमसीए कार्यकारिणी सदस्य आणि आयोजन समिती सदस्य यांच्यात रंगेल. या स्पर्धेतील विजेत्यांवर रोख पुरस्कारांचा वर्षाव केला जाणार असून वैयक्तिक पुरस्कारही दिले जाणार आहेत. स्पर्धेचे उद्घाटन 22 मार्च रोजी सकाळी 9 वा. मुंबई क्रिकेट संघटनेचे सचिव अभय हडप यांच्या हस्ते होईल, अशी माहिती युवासेनेचे उपसचिव व युवा व्हिजनचे अध्यक्ष प्रथमेश सकपाळ आणि गिरगाव बॉईज यांनी दिली.

Comments are closed.