मोहालीमध्ये शेतकरी नेत्यांनी अटक केली

वृत्तसंस्था / चंदीगढ

पंजाबच्या मोहाली शहरात धरणे देणाऱ्या अनेक शेतकरी नेत्यांना अटक करण्यात आली आहे. या नेत्यांमध्ये जगजीत सिंग डल्लेवाल आणि सर्वन सिंग यांचाही समावेश आहे. पंजाबमध्ये सत्ताधारी असणाऱ्या आम आदमी पक्षाच्या अनेक मंत्र्यांनी शेतकरी नेत्यांना अटक होणार नसल्याचे आश्वासन दिले होते. तरीही या नेत्यांना अटक झाल्यामुळे आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे.

अटक झालेले शेतकरी नेते चंदीगढहून शंभू सीमारेषेकडे निघाले होते. शंभू सीमा हरियाणा आणि पंजाब या दोन राज्यांमध्ये आहे. पुढे खनौरी येथे जाण्याचा या नेत्यांचा विचार होता. तथापि, त्यांना मोहाली येथेच अटक करण्यात आली. पंजाबमध्ये सध्या दोन स्थानी शेतकऱ्यांची आंदोलने होत आहेत. चार प्रमुख मागण्यांसाठी ही आंदोलने केली जात आहेत. पंजाबच्या राज्य सरकारने शेतकऱ्यांशी चर्चा करण्याची तयारी दाखविलाr असूनही शेतकरी नेते आंदोलनावर ठाम आहेत. शेतकरी नेत्यांच्या अटकेचे तीव्र पडसाद उमटण्याची शक्यता आहे.

Comments are closed.