महिला अत्याचाराचे दोन वर्षांत 93 हजारांवर गुन्हे, मिंधे सरकारच्या काळात गुन्हेगारी उदंड

‘सर्वसामान्यांचे सरकार’ असे बिरुद मिरवलेल्या मिंधे सरकारच्या काळात राज्यामध्ये गुन्हेगारीचे प्रमाण वाढले होते अशी आकडेवारी समोर आली आहे. 2023 आणि 2024 या दोन वर्षांमध्ये महिला अत्याचाराचे 93 हजारांवर गुन्हे नोंद झाले. त्यात बलात्कार, अपहरण, हुंडाबळी, पती व नातेवाईकांकडून झालेली क्रूर कृत्ये, विनयभंग व लैंगिक छळ, अत्याचार, अनैतिक व्यापार या स्वरूपाच्या गुह्यांचा समावेश आहे. लहान मुलांसंदर्भातील गुह्यांचा आकडाही नऊ हजारांपेक्षा जास्त आहे.

समर्थन अर्थसंकल्प अध्ययन केंद्राने गृह विभागासंदर्भातील ही धक्कादायक आकडेवारी आर्थिक पाहणी अहवालाच्या आधारे दिली. सन 2023 मध्ये महिला अत्याचारासंदर्भात नोंद झालेल्या गुह्यांची संख्या 47 हजार 132 इतकी आहे, तर 2024 मध्ये तो आकडा किंचित कमी होऊन 46 हजार 459 इतका झाला. बलात्काराचे गुन्हे मात्र 2023 पेक्षा 2024 मध्ये वाढल्याचे दिसून येते. त्याचप्रमाणे विनयभंग आणि लैंगिक छळाच्या गुह्यातही 2023 पेक्षा 2024 मध्ये 343 ने वाढ झाली.

लहान मुलांच्या बाबतीत घडणारे गुन्हे रोखण्यासाठी ‘पोक्सो’ कायदा, बाल न्याय कायदा, बाल संरक्षण युनिट्स, बालकल्याण समित्या असूनही बालकांवरील अत्याचारांमध्ये सातत्याने वाढ असल्याचेही आकडेवारी सांगते.

महाराष्ट्रात एक दशलक्ष लोकसंख्येला केवळ 170 पोलीस

महाराष्ट्राची एकूण लोकसंख्या 12 कोटी 83 लाख असून 2024 च्या आकडेवारीनुसार पोलिसांची संख्या 1 लाख 98 हजार 870 इतकी आहे. त्याप्रमाणे एक लाख लोकसंख्येमागे केवळ 170 पोलीस आहेत. महिला पोलिसांची संख्या 36 हजार 9 इतकी असून महिला पोलिसांचे प्रमाण एकूण पोलीससंख्येत 18.11 टक्के इतके आहे.

मुख्यमंत्र्यांकडूनच कबुली

एकूण गुह्यांची संख्या 2023 आणि 2024 ची तुलना केली तर गुह्यांमध्ये 2 हजार 586 ची घट आहे. विनयभंग व बलात्कार या दोन संज्ञांमध्ये वाढ झालेली आहे. पण सातत्याने आपण पाहिले तर, 2013मध्ये आपण गुह्यांची व्याख्या बदलली. त्यामुळे ही वाढ झाल्याचे दिसत असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

महिलांवरील अत्याचार

2023 2024

बलात्कार 7524 740

अपहरण 9361 8883

हुंडाबळी                     170  139

विनयभंग व लैंगिक छळ      17328        17671

अत्याचार                   211  159

अनैतिक व्यापार 1312 1128

बालकांवरील अत्याचार

2023 2024

रक्त 84 95

अर्भक हत्या                  6        11

भ्रूणहत्या                      4          3

बलात्कार 4594 4650

अपहरण 12564 12671

सोडून देणे (परित्याग)                7              45

इतर                      4503    5103

Comments are closed.