Sanjay Shirsat stated that the chances of Uddhav Thackeray and Raj Thackeray coming together are slim
सध्या राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली असली तरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही बंधू एकत्र येण्याची शक्यता कमीच असल्याचे म्हणत कारणही सांगितले आहे.
मुंबई : राज ठाकरे यांनी युतीसाठी दिलेल्या टाळीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिटाळी दिली आहे. मराठीसाठी आणि महाराष्ट्राच्या हितासाठी किरकोळ भांडण बाजूला ठेवायला तयार आहोत, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी काही अटी शर्ती ठेवल्या आहेत. त्यामुळे सध्या राज्याच्या राजकारणात ठाकरे बंधू एकत्र येण्याबाबत चर्चा रंगली असली तरी वेगवेगळ्या प्रतिक्रिया उमटत आहेत. अशातच शिवसेना शिंदे गटाचे मंत्री संजय शिरसाट यांनी दोन्ही बंधू एकत्र येण्याची शक्यता कमीच असल्याचे म्हणत कारणही सांगितले आहे. (Sanjay Shirsat stated that the chances of Uddhav Thackeray and Raj Thackeray coming together are slim)
माध्यमांशी संवाद साधताना संजय शिरसाट म्हणाले की, राज ठाकरे यांनी जी भूमिका आज घेतलेली आहे, ती काही नवीन नाही. कारण यापूर्वी देखील त्यांनी अशी भूमिका घेतली होती. त्यावेळी राज ठाकरे असे म्हणाले होते की, एका हाताने टाळी वाजत नाही. मात्र मागच्या प्रस्तावाचे काय झाले? तोच अनुभव राज ठाकरे यांना याही वेळी येईल. तसेच पक्ष चालवताना किंवा एखादी संघटन चालवताना जो संयम असावा लागतो, जे धाडस असावे लागते ते राज ठाकरे यांच्यामध्ये निश्चित आहे. परंतु राज ठाकरे युतीमध्ये गेल्यावर त्याचे काय परिणाम होतील, याची जाणीव उद्धव ठाकरेंना आहे. कारण उद्धव ठाकरे यांना स्वतःच्या संघटनेमध्ये इतरांनी येणे उचित वाटत नाही. हा आतापर्यंतचा अनुभव आहे. महाविकास आघाडीचं काय झालं? शरद पवार आणि त्यांचे जमले नाही, काँग्रेस आणि त्यांचे जमले नाही. त्यामुळे आता राज ठाकरे यांच्याशी तर उद्धव ठाकरे याचं जमणारच नाही. कारण राज ठाकरे यांना सर्व गोष्टी माहिती असल्यामुळे उद्धव ठाकरे त्यांच्यासोबत युती करण्यास तयार होणार नाही, असे मला वाटत असल्याचे संजय शिरसाट म्हणाले.
हेही वाचा – Sanjay Raut : राज ठाकरेंची भूमिका नाकारण्याचा करंटेपणा…; दोन्ही ठाकरे एकत्र येण्यावर काय म्हणाले राऊत?
भविष्यातही उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासोबत जाणार नाही
संजय शिरसाट म्हणाले की, उद्धव ठाकरेंच्या इगोमुळे त्याचं कुटुंब विभक्त झालं. राज ठाकरे यांना कधीही पक्ष सोडायचा नव्हता आणि त्यांनी तशी भाषा ही कधी केली नव्हती. त्यामुळे आता राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांना प्रस्ताव दिला असला तरी उद्धव ठाकरे तो स्वीकारणार नाही. कारण त्यांना वेगळं आणि एकटं राहायचं आहे. तसेच आजचा प्रस्ताव राज ठाकरेंचा आहे, उद्धव ठाकरेंचा नाही. भविष्यातही उद्धव ठाकरे राज ठाकरे यांच्यासोबत जाणार नाहीत. कारण त्यांचे विचार वेगळे झालेले आहेत. उद्धव ठाकरेंना आता शरद पवार, काँग्रेस आणि बाकी इतर काही घटक पक्षांसोबत जाण्यास स्वारस्य आहे, अशी टीकाही संजय शिरसाट यांनी केली.
हेही वाचा – MNS : ठाकरे गट आता पवार गट आणि काँग्रेसला धोका देण्याच्या तयारीत, अशा पक्षावर…; काय म्हणाला मनसे नेता?
Comments are closed.