सिडकोचा मुर्दाडपणा, घरं नाकारणाऱ्यांचे डिपॉझिट परत करण्यात कागदपत्रं पडताळणीचं कारण देत चालढकल

नवी <एक शीर्षक ="मुंबई" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/mumbai" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स"> मुंबई & nbsp ;: <एक शीर्षक ="महाराष्ट्र" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/maharashtra" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">महाराष्ट्र शासनाच्या शहर व औद्योगिक विकास महामंडळ अर्थात सिडकोनं माझे पसंतीचे सिडकोचे घर या योजनेद्वारे 26000 घरांच्या विक्रीसाठी लॉटरी काढली होती. सिडकोच्या माझे पसंतीचे घर योजनेला अपेक्षेपेक्षा कमी प्रतिसाद मिळाला. या योजनेतील घरांच्या किमती कमी करण्यासाठी आंदोलन सुरु असताना सिडकोच्या अन्यायकारक कारभाराचा आणखी एक प्रकार समोर आला आहे. सिडकोची घरं ज्यांना लॉटरीमध्ये लागली होती, त्यापैकी अनेकांनी विविध कारणांनी नाकारली आहेत. ज्यांनी घरं नाकारली किंवा परत केली त्यांनी डिपॉझिट म्हणून भरलेली रक्कम परत देण्यास सिडकोकडून उशीर केला जात असल्याचं समोर आलं आहे. सिडकोनं अर्जदारांकडून डिपॉझिट म्हणून 75 हजार, 1 लाख  50 हजार आणि 2 लाख असं डिपॉझिट घेतलं होतं. मात्र, ज्यांनी घरं नाकारली त्यांना डिपॉझिटची रक्कम परत देण्यास उशीर होत असल्याचं निदर्शनास आलं आहे.  

नेमकं प्रकरण काय?

सिडकोच्या लॉटरीमध्ये 19 हजार जणांना घरं लागली होती. मात्र, अनेक कारणांमुळं ज्यांना घरं लागली त्यांनी ती नाकारली किंवा सिडकोला परत केली. ज्यांनी सिडकोची घरं नाकारली त्यांना नियमाप्रमाणं डिपॉझिटची रक्कम परत करणं आवश्यक आहे. मात्र, सिडकोकडून यात उशीर होत असल्याचं समोर आलं आहे. सिडकोनं अर्जदारांकडून 75 हजार, 1 लाख 50 हजार आणि 2 लाख रुपये असं डिपॉझिट जमा करुन घेतलं होतं. ज्यांनी घरं नाकारली किंवा परत केली त्यांना ही रक्कम देण्यासाठी सिडकोनं अर्जदारांकडून बँक डिटेल्स वगैरे घेण्यात आल्या आहेत, पण प्रोसेसला ३ महिने लागणार असं सांगितलं जात आहे. मात्र, म्हाडा ज्या प्रकारे अर्जदारांच्या डिपॉझिटची रक्कम परत करण्याची प्रक्रिया वेगवान पद्धतीनं राबवतं त्या प्रमाणं सिडको जलद कृती का करत नाही, असा सवाल अर्जदारांकडून करण्यात येत आहे.  

सिडकोच्या घरांना अर्जरादांचा अल्प प्रतिसाद

सिडकोनं माझे पसंतीचे घरे या योजनेद्वारे 26 हजार घरांच्या विक्रीसाठी सोडत काढण्यात आली होती. सिडकोनं या घरांसाठी अर्जदारांचा चांगला प्रतिसाद मिळावा म्हणून मोठ्या प्रमाणात जाहिराती दिल्या होत्या. अर्ज करण्यासाठी अनेकदा मुदतवाढ देखील दिली गेली. मात्र, सिडकोकडून 25723 घरांची लॉटरी काढण्यात आली. त्यापैकी 21 हजार घरांची सोडत 15 फेब्रुवारीला काढण्यात आली होती. यामध्ये 19518 अर्जदार यशस्वी ठरले होते. मात्र, 16 एप्रिल पर्यंतच्या आकडेवारीनुसार 2900 ग्राहकांनी घर खरेदीसाठीचं कर्न्फमेशन अमाऊंट भरली आहे. त्यामुळं सिडकोच्या उर्वरित घरांच्या विक्रीचा प्रश्न निर्माण झाला आहे. 

इतर बातम्या :

Comments are closed.