जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना शिंदेंनी विमानानं आणलं, मिंध्यांच्या खासदाराचं असवंदेनशील वक्तव्य

पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर कश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या राज्यातील पर्यटकांना धीर देण्याबरोबरच तेथून त्यांना सुखरूप परत आणण्यासाठी महायुती सरकारच्या नेत्यांत स्पर्धा लागली होती. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी मंत्री गिरीश महाजन यांना तातडीने श्रीनगरला पाठवले असतानाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे कश्मीर दौऱ्यावर रवाना झाले होते. त्यावरून दहशतवादी हल्ल्यातही शिंदेंची श्रेयासाठी धडपड सुरू असल्याची टीका त्यांच्यावर झाली. या टीकेला उत्तर देताना मिंधे गटाचे खासदार नरेश म्हस्के यांनी अत्यंत असवंदेनशील वक्तव्य केलं आहे.
नरेश म्हस्के यांनी पत्रकारांशी बोलताना ‘जे कधी विमानात बसले नाहीत त्यांना शिंदेंनी विमानानं आणलं आहे’, असं विधान नरेश म्हस्के यांनी केलं आहे. ”वर्धा नागपूरचे 45 लोकं रेल्वेने गेले होते. त्यांची अतिशय वाईट परिस्थिती होती. ते आयुष्यात कधीही विमानात बसले नव्हते. त्या लोकांना विमानाने आणण्याची व्यवस्था एकनाथ शिंदे यांनी केली आहे. गरिब लोकं, खाण्याचा प्रॉब्लेम होता. ती लोकं पहिल्यांदा विमानात बसवून महाराष्ट्रात आणतायत’, असे नरेश म्हस्के म्हणाले.
Comments are closed.