पहलगाम हल्ल्यानंतर भारताच्या बाजूने उभा राहिला पाकचा माजी दिग्गज, पाकिस्तानात खळबळ!

पहलगाममध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत पाकिस्तान समोरासमोर आहेत. सचिन तेंडुलकर, विराट कोहली आणि युवराज सिंग अशा दिग्गज खेळाडूंनी या हल्ल्यानंतर दुःख व्यक्त केले आहे. त्यामध्येच आता पाकिस्तानमधील एक दिग्गज क्रिकेटर खेळाडूची प्रतिक्रिया समोर येत आहे. बासित अलीने हल्ल्यातील मृत व्यक्तींना शहीद म्हणत म्हटले की, हा खूप मोठा अन्याय झाला आहे. ही गोष्ट माफ करण्याजोगी अजिबात नाही.

कश्मीरमध्ये जीव गमावलेल्या लोकांना बासित अलीने शहीद म्हटले आहे. तसेच तो म्हणाला, कोणालाही दुसऱ्या लोकांचा जीव घेण्याचा हक्क नाही. ज्या लोकांनी हे काम केले आहे त्यांना अजिबात माफी देऊ नये.

बासित अली पुढे बोलताना म्हणाला, कोणालाही कोणाचा जीव घ्यायचा हक्क नाही, हेच माझा धर्म सांगतो. मग तो इसाई असो यहुदी किंवा अजून कुठल्याही धर्मातील असो. जो दुसऱ्या धर्मातील लोकांचा जीव घेत असेल तो मुसलमान असूच शकत नाही. जर माझा मोठा भाऊ असं काही करेल तर मी त्याचा जीव घेईल. बासित अलीने बीसीसीआयच्या त्या निर्णयाचे कौतुक केले, ज्या अंतर्गत मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद सामन्यांमध्ये सर्व ऑफिशियल, कॉमेंट्री आणि खेळाडू हातावर काळी पट्टी बांधून मैदानात उतरले होते.

बासित अलीच्या बोलण्यामध्ये राग होता. तो म्हणाला, मी छाती ठोकून सांगतो की हे काम ज्याने कुणी केले आहे त्यांना माफी तर अजिबात मिळता कामा नये. जर मी असे काही केले असते तर मला फाशी शिक्षा व्हायला हवी. माझ्या धर्मात हे लिहिले नाही की, कुणाचा तरी जीव घ्यावा. तो हे देखील म्हणाला, ज्या क्रूरकर्म्यांनी हा हल्ला केला आहे त्यांच्या घरच्यांना सुद्धा शिक्षा व्हायला हवी.

त्याने सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा शोक व्यक्त केला आहे.

Comments are closed.