ठाकरेंची शिवसेना देशाचा इतिहास विसरली याचं दु:ख, मुख्यमंत्री फडणवीसांचा हल्लाबोल
देवेंद्र फड्नाविस: भारतातील पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ भारत सोडावा लागेल, अन्यथा कारवाई केली जाणार असल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडनाविस यांनी व्यक्त केले. यावेळी फडणवीस यांनी शिवसेना ठाकरे गटावरही (Shivsena Thackeray group) टीका केली. ठाकरेंची शिवसेना देशाचा इतिहास विसरली आहे. याचं दु;ख असल्याचे फडणवीस म्हणाले. आता युद्धजन्य परिस्थिती असेल किंवा देशावर झालेला हल्ला असेल अशावेळी विरोध करणे, मुर्खासारखी वक्तव्य करणं सुरु आहे, देशाची जनता त्यांना माफ करणार नाही असे फडणवीस म्हणाले. बांगलादेशच्या युद्धावेळी अटलबिहारी वाजपेयी यांनी इंदिरा गांधी यांना समर्थन दिलं होते असेही फडणवीस म्हणाले.
युद्धपरिस्थितीत देशातील पक्षांनी कधीही पक्ष बघितला नाही
दुश्मन ज्यावेळी आपल्या देशावर हल्ला करत आहे, त्यावेळी भारत देशातील सर्वच पक्षांनी कधी राजकारण केलं नाही हा देशाचा इतिहास असल्याचे फडणवीस म्हणाले. शिवसेना ठाकरे गट देशाचा इतिहास विसरली याचे मला दु:ख असल्याचे फडणवीस म्हणाले. या देशाचा असा इतिहास आहे की, जेव्हा युद्धपरिस्थिती असते किंवा देशावर झालेला हल्ला असतो, त्यावेळी या देशातील पक्षांनी कधीही पक्ष बघितला नाही. हीच या देशाची परंपरा राहिली आहे. पण अशा स्थितीत विरोध करणे सुरु आहे, त्यांना देशाची जनता माफ करणार नाही.
सर्वपक्षीय बैठकीला ठाकरे गटाचे खासदार गैरहजर
पहलगाम दहशतवादी हल्ल्यात 26 जणांना प्राण गमवावे लागले आहेत. त्यामुळे या प्रकारचा सर्वच स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. या घटनेनंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे नेतेमंडळी अधिक आक्रमक झाले आहेत. या घटनेनंतर तातडीने सर्वपक्षीय बैठक घेत सर्व घटनाक्रमाची माहिती देण्याची मागणी ठाकरे गटाच्यावतीने करण्यात आली होती. त्यानंतर गुरुवारी सायंकाळी दिल्लीत सर्वपक्षीय बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. नेमक्या या बैठकीला ठाकरे गटाचे खासदार गैरहजर राहिल्याने उलटसुलट चर्चेला उधाण आले होते.
पाकिस्तानच्या नागरिकांनी 48 तासात देश सोडावा
पाकिस्तानचे जे नागरिक भारतात आले आहेत, त्यांनी पुढच्या 48 तासात देस सोडावा, अन्यथा त्यांच्यावर कारवाई करणार असल्याचे देवेंद्र फडणवीस म्हणाले. भारतातील पाकिस्तानी नागरिकांचा व्हिसा रद्द करण्यात आला आहे. त्यामुळं पाकिस्तानी नागरिकांना तात्काळ भारत सोडावा लागेल अन्यथा कारवाई असे फडणवीस म्हणाले. त्यांची लिस्ट काढली जात आहे, आम्ही माहिती घेत आहोत. पाकिस्तानी नागरिकांनी 48 तासांच्यावर भारतात राहू नये आम्ही पूर्णपणे नियंत्रण ठेवणार आहोत असे फडणवीस म्हणाले. पाकिस्तानी अॅक्टर आणि प्लेयर यांच्याबाबतीत आमच्या मनात कोणतीही सहानभूती नाही असे फडणवीस म्हणाले.
राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे
यावेळी देवेंद्र फडणवीस यांनी राहुल गांधी यांच्यावर देखील टीका केली. आतातरी राहुल गांधी यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करावे असे फडणवीस म्हणाले. आता तरी राहुल गांधी हे स्वातंत्र्यवीर सावकर यांच्याबद्दल बोलताना विचार करतील असे फडणवीस म्हणाले.
https://www.youtube.com/watch?v=c_bykkc5efe
महत्वाच्या बातम्या:
महाराष्ट्रातील 500 पर्यटक मायभूमीत उतरले; उर्वरीत 232 प्रवाशांसाठी आणखी एका विमानाचे उड्डाण
अधिक पाहा..
Comments are closed.