फलंदाजीमध्ये विराट, पण गोलंदाजीमध्ये RCB चा खरा मॅच विनर कोण?
आयपीएल 2025 मध्ये आरसीबी संघ चांगलं प्रदर्शन करताना दिसत आहे. आरसीबीने 24 एप्रिल रोजी त्यांचा हंगामातील सहावा विजय मिळवला आणि पॉईंट्स टेबलवर तिसऱ्या स्थानावर पोहोचले. एका बाजूला त्यांचा मॅच विनर विराट कोहली होता तर दुसरीकडे गोलंदाजांमध्ये आरसीबीच्या विजयाचा हिरो ठरला तो म्हणजे आरसीबीने ज्याला 12.5 करोड रुपयांना खरेदी केले होते. आरसीबीच्या प्रशिक्षकांनी त्याचे भरभरून कौतुक केले आहे.
राजस्थानने आरसीबी विरुद्ध सामन्यात टॉस जिंकून गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. विराट कोहली फलंदाजी करण्यासाठी उतरला तेव्हा तो विरोधी संघावर बरसला त्याने 70 धावांची जोरदार पारी खेळली. याशिवाय देवदत्त पडिकलने सुद्धा अर्धशतक झळकावले आणि धावसंख्या 200 च्या पुढे नेली. राजस्थानला आरसीबीने 206 धावांचं आव्हान दिलं होतं.
राजस्थान संघ धावांचा पाठलाग सुरू करत होता तेव्हा आरसीबी थोडी दबावात दिसत होती. यशस्वी जयस्वाल ने 49 धावांची पारी खेळून जोरदार सुरुवात केली होती. पण आरसीबीने बारा करोड रुपयांना खरेदी केलेल्या जोश हेझलवूडने त्याची क्षमता दाखवून जोरदार प्रदर्शन केले. त्याने यशस्वी जयस्वाल, ध्रुव जुरेल, शिमरॉन हेटमायर आणि जोफ्रा आर्चर यांना बाद करत राजस्थानला 11 धावा करण्यापासून थांबवले आणि आरसीबीला विजय मिळवून दिला.
एंडी फ्लावर यांनी आरसीबीच्या विजयावर आनंद व्यक्त केला. ते म्हणाले, मी आरसीबीच्या शेवटच्या दोन षटकांबद्दल बोलेल कारण त्यामध्ये फक्त सात धावा दिल्या गेल्या आणि तीन विकेट्स घेतल्या. जोश हेझलवूड शानदार गोलंदाज आहे. तो वर्ल्ड क्लास बॉर्डर आहे. त्याच्याकडे कोणत्याही फॉरमॅटमध्ये दबाव स्वीकारण्याची क्षमता आहे. त्याच्याकडे वेगवेगळ्या प्रकारे गोलंदाजी करण्याची सुद्धा कला आहे. यॉर्कर, वाईड यॉर्कर आणि हळू गतीने गोलंदाजी करणे हे सर्व त्याला जमते.
Comments are closed.