महिला म्हणाल्या, टिकल्या काढल्यामुळे आम्ही वाचलो; शरद पवारांना अजून काय पुरावा पाहिजे?, प्रकाश

शरद पवार वर प्रकाश महाजन: हिंदू आहेत म्हणून दहशतवाद्यांनी पर्यटकांना गोळ्या (Pahalgam Terror Attack) घातल्या असं म्हणतात. पण यात काय सत्य आहे याची मला माहिती नाही. पण तिथं जे लोक होते त्यातल्या स्त्रियांना सोडलं आहे. मी एका भगिनीच्या घरी गेलो होतो. त्यावेळी त्यांनी सांगितले आम्हा महिलांना हात लावले नाही. त्यांनी फक्त आमच्या पुरुषांना हात लावला, असं विधान शरद पवार गटाचे प्रमुख शरद पवार (Sharad Pawar) यांनी केलं. शरद पवारांच्या या वक्तव्यावरुन मनसेचे ज्येष्ठ नेते प्रकाश महाजन (Prakash Mahajan) यांनी निशाणा साधला.

शरद पवारांचे वक्तव्य दुर्दैवी आणि राजकीय सोयीचे आहे. नेहमी शरद पवार नरो वा कुंजरो अशी भूमिका घेतात. पीडित कुटुंबाला भेटायला गेलेल्या शरद पवारांना महिलांनी सांगितलं की,  टिकल्या काढल्या म्हणून  आम्ही वाचलो…अजून शरद पवारांना काय पुरावा पाहिजे?, त्यांना नेमकी कुठली भीती वाटते? ते मुस्लिमांचं एवढं का लांगूलचालन करतात?, असा सवाल प्रकाश महाजन यांनी उपस्थित केला. हिंदू म्हणून त्यांनी मारले हे कटू सत्य का शरद पवार नाकारतात?, तुम्ही ढोगी म्हणून पुरोगामित्व का मिरवून घेता?, हिंदू म्हणून मारलं हे का मान्य करत नाही?, असा प्रश्नही प्रकाश महाजन यांनी शरद पवारांना विचारला.

पहलगाम हल्यात मृत्यू  पावलेला मुस्लिम व्यक्तीमुळे बाकीचे बलिदान धर्माच्या नावावर नव्हते असे म्हणता येत नाही. तो मयत व्यक्ती बकरवाल सामजाचा होता. त्याला इस्लाम जवळचा समजत नाही, तरीही त्या माणसाने माणुसकीचा विचार केला, असं प्रकाश महाजन म्हणाले.  हिंदू कोणाची धार्मिक भावना दुखावत नाही. 10 वर्षाच्या मुलाने माझ्या वडिलांना हिंदू म्हणून मारल्याचे सांगितले आहे, हे तुम्ही का नाकारता? दहशतवादी हिंदूंना मारायला आले होते. नाहीतर त्यांनी चौफेर गोळीबार केला असता. महिलांना उदात्त हेतूने सोडले नाही, त्यांना इतरांना सांगण्यासाठी सोडले, असंही प्रकाश महाजन म्हणाले.

काश्मीरच्या लोकांकडून आर्थिक कारणाने सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न-

काश्मीरीकडून आर्थिक कारणाने सहानुभूती दाखवण्याचा प्रयत्न आहे. काश्मीरचे लोक अजूनही स्वतःला भारताचा घटक समजत नाहीत. स्थानिक आधार दिल्याशिवाय आणि रस्ता दाखवल्याशिवाय अतिरेकी आले नाहीत. सरकारच्या गुप्तचर विभागाचे हे अपयश आहेच ,मात्र स्थानिक लोकही मदत करतात हे कटू सत्य आहे, असं प्रकाश महाजनांनी सांगितले. तसेच ज्या लोकांनी आपल्याला गोळी मारून घेतली त्यांचा मी ऋणी आहे. त्यांनी हिंदू धर्म टिकवला प्रत्यक्ष मृत्यू दिसत असताना त्यांनी आपला धर्म नाकारला नाही. मात्र शरद पवार यांना हे केव्हा कळणार…शरद पवारांचा विचार त्यांच्या राजकीय सोयीच्या गणितासाठी असतो, असा हल्लाबोल प्रकाश महाजनांनी केला. तेरावा बॉम्बस्फोट कुठे झाला ? ती जागा अजूनही शरद पवार दाखवत नाहीत, अशी टीकाही प्रकाश महाजन यांनी केली. तसेच ज्यांच्या वडिलांनी आयुष्यभर हिंदुत्वाचा पुरस्कार केला, त्या उद्धव ठाकरेंचा एकही खासदार दिल्लीतील सर्वपक्षीय बैठकीला नव्हता. तरीही तुम्ही स्वतःला हिंदूंचे कैवारी म्हणता…हे हिंदू धर्मात जन्माला आले याची लाज वाटते, असा निशाणा प्रकाश महाजन यांनी ठाकरे गटावर साधला.

संबंधित बातमी:

Sharad Pawar on Pahalgam Terror Attack : केंद्र सरकार म्हणायचं आम्ही दहशतवाद मोडून काढलाय, चिंता नाही, पण…; पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर शरद पवारांची पहिली प्रतिक्रिया

अधिक पाहा..

Comments are closed.