Dream Astrology : स्वप्नात पक्षी दिसणे शुभ की अशुभ?
स्वप्नांची दुनिया ही विलक्षण अनुभव देणारी असते. काही स्वप्ने गुलाबी अनुभव देणारी तर काही अक्षरश: झोप उडवणारी असतात. खरं तर एखादा व्यक्ती स्वप्न पाहतो, ही एक नैसर्गिक क्रिया असते. व्यक्ती स्वप्नात विविध गोष्टी पाहतो. यातील काही गोष्टी शुभ गोष्टींचे संकेत देतात तर काही अशुभ गोष्टींचे संकेत देतात, असे स्वप्नशास्त्रात सांगण्यात आले आहे. यापैंकी एक स्वप्नात पक्षी पाहणे आहे. अनेकांना स्वप्नात विविधप्रकारचे पक्षी दिसतात… पण, यामागील नेमका अर्थ काय? स्वप्नात असे पक्षी दिसणे शुभ की अशुभ? आजच्या लेखात जाणून घेऊयात स्वप्नात पक्षी दिसणे शुभ की अशुभ आणि त्यामागील अर्थ काय आहे.
पक्षी दिसणे शुभ की अशुभ?
स्वप्नात विविध प्रकारचे पक्षी दिसू शकतात. यातील काही पक्षी स्वप्नात दिसणे शुभ तर काही पक्षी अशुभ सांगितले जातात.
हे पक्षी दिसणे शुभ –
मयूर (मयूर)

मोर हे कार्तिकेयाचे वाहन आहे. स्वप्नशास्त्रानुसार, मोर स्वप्नात दिसणे शुभ असते. यामुळे नोकरीत बढती मिळू शकते.
नीलकांत (इंडियन रोलर)

ज्या व्यक्तींचे लग्न झाले नाही अशा व्यक्तींसाठी नीलकंठ स्वप्नात दिसणे एक प्रकारची पर्वणीच असते. हे लक्षण लवकर लग्न जमण्याचे आहेत.
हंस (हंस)

स्वप्नात हंसाची जोडी पाहणे किंवा पाण्यात हंस पोहताना पाहणे शुभ असते. असे हंसाचे स्वप्न पाहणे सुख आणि समृद्धीचे संकेत असतात.
पोपॅट

स्वप्नशास्त्रानुसार, जर तुम्हाला स्वप्नात पोपट दिसला तर समजावे तुमचे चांगले दिवस जवळ आले आहेत. स्वप्नात पोपट दिसणे आर्थिक लाभाचे लक्षण असते. जर स्वप्नात जोडी दिसली तर यामुळे पती-पत्नीच्या नात्यात गोडवा वाढतो.
घुबड (Owl)

स्वप्नात घुबड दिसणे शुभ असते. जर स्वप्नात घुबड दिसले तर घरात देवी लक्ष्मीचे आगमन होऊ शकते. आर्थिक भरभराट होण्यास सुरूवात होते.
हेही पाहा –
Comments are closed.