दुनियेतला प्रत्येक गोलंदाज टाळेल अशी कामगिरी, CSKच्या गोलंदाजाचा लाजीरवाणा विक्रम
चेन्नई सुपर किंग्स संघावर आयपीएल 2025 मध्ये त्यांच्या लाजिरवाण्या प्रदर्शनानंतर आता त्यांच्यावर खूप प्रश्न उपस्थित होत आहेत. त्यांना शुक्रवार 26 एप्रिल रोजी सनरायझर्स हैदराबादकडून पराभवाचा सामना करावा लागला. या संघाला हंगामातील नव्या सामन्यात सातवा पराभव पत्करावा लागला आहे. चेन्नई प्लेऑफ रेस मधून बाहेर पडली आहे. आता त्यांना अंतिम चार संघांमध्ये पोहोचण्यासाठी बाकीचे पाच सामने जिंकावे लागतील. याशिवाय बाकी संघाच्या निर्णयावर सुद्धा बाकीचे समीकरण अवलंबून असेल.
चेन्नईच्या या लाजिरवाण्या पराभवाला त्यांच्या फलंदाजांसोबत गोलंदाज सुद्धा तितकेच जबाबदार आहेत. शिवम दुबे शिवाय संघातील कोणताही खेळाडू संघासाठी 200 पेक्षा अधिक धावा करू शकला नाही. तसेच नूर अहमद, आणि खलील अहमद सोडून बाकीचे गोलंदाज प्रभावी कामगिरी करू शकले नाहीत. दोघांशिवाय कोणत्याही खेळाडूने 10 विकेट्स घेतल्या नाहीत. मथीशा पथिराना संघाचा महत्त्वपूर्ण गोलंदाज आहे, पण त्याने सुद्धा 7 सामन्यांमध्ये फक्त 7 विकेट्स घेतल्या आहेत.
पथिरानाला चेन्नईने 13 करोड रुपयांना त्यांच्या ताफ्यात परत घेतले होते. त्यांचा हा निर्णय आता चुकीचा ठरला आहे. त्याने सनरायझर्स हैदराबाद विरुद्ध सामन्यात तीन षटकात 27 धावा दिल्या. त्याने काही वेळा वाईड चेंडू टाकले आणि संघ त्यामुळे अडचणीत सापडला. त्यामुळे त्याच्या नावावर एक लाजिरवाणा विक्रम झाला आहे.
पथिराना आयपीएल दरम्यान कोणत्याही एका मैदानावर सर्वात जास्त वाईड चेंडू फेकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे. त्याने चेन्नई चेपॉक स्टेडियमवर 40 वाईड चेंडू टाकले आहेत. त्याने हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात सुद्धा 5 वाईड फेकले आहेत. यामुळे कर्णधार महेंद्रसिंग धोनी, निराश दिसून आला त्याचबरोबर त्याला समजावताना सुद्धा दिसला.
एका मैदानावर सर्वात जास्त वाईड चेंडू फेकणाऱ्या गोलंदाजांच्या यादीत सर्वात पहिल्या स्थानावर मोहम्मद सिराज आहे. त्याने बंगळुरूच्या एम चिन्नास्वामी स्टेडियम मध्ये 45 वाईड चेंडू टाकले आहेत. त्याच्यानंतर पथिराना आहे. याचबरोबर ड्वेन ब्रावोने चेपॉकमध्ये 37, लसिथ मलिंगाने वानखेडे स्टेडियमवर 36 आणि मिचेल मैक्गेलनाघनने वानखेडे मध्येच 35 वाईड चेंडू टाकले आहेत.
Comments are closed.