Ashish Shelar criticizes Sharad Pawar calling him the mastermind of separatists in the wake of the Pahalgaon terror attack
शरद पवार यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारलं यात किती तथ्य आहे, हे माहीत नाही, असे वक्तव्य केले आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून टीका होताना दिसत आहे. अशातच भाजपा नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांना अलगाववाद्यांचे आका असे म्हटले आहे.
मुंबई : जम्मू-काश्मीरच्या पहलगाममध्ये 22 एप्रिल रोजी दहशतवादी हल्ल्यात एका विदेशी नागरिकासह 26 पर्यटकांचा मृत्यू झाला आहे. मृतांमध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचाही समावेश आहे. धर्म विचारून मारल्यामुळे सध्या देशभरात संतापाची लाट आहे. मृतांचे नातेवाईकही सांगत धर्म विचारून मारलं. मात्र राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी दहशतवाद्यांनी धर्म विचारून मारलं यात किती तथ्य आहे, हे माहीत नाही, असे वक्तव्य केले आहे. शरद पवार यांच्या वक्तव्यावर राजकीय वर्तुळातून टीका होताना दिसत आहे. अशातच भाजपा नेते आशिष शेलार यांनी शरद पवार यांचे नाव न घेता त्यांना अलगाववाद्यांचे आका असे म्हटले आहे. (Ashish Shelar criticizes Sharad Pawar calling him the mastermind of separatists in the wake of the Pahalgaon terror attack)
माध्यमांशी संवाद साधताना आशिष शेलार म्हणाले की, हिंदू एकता झाली की जातीवर विभागले गेलो पाहिजेत, अशी भूमिका मांडणारी काही लोक महाराष्ट्रात आहेत. खरं तर असे लोक अलगाववाद्यांचे आका आहेत. जाती-जातीत वाद लावा, भाषाभाषांमध्ये भांडणं लावा., ब्राह्मणांना मराठ्यांविरोधात झुंजवा आणि मराठ्यांना अजून कुणाविरोधात तरी झुंजवा, हीच यांची मनोवृत्ती आहे. लोकांच्या जनमताने संविधानिक पदावर असलेल्या देवेंद्र फडणवीस यांना हेच ज्येष्ठ नेते प्रश्न विचारतात, ही काय पेशवाई आली आहे का? मग हा जातीयवादी प्रश्न नाही का? ज्येष्ठ नेते आहात ना? मग मुद्द्यावर प्रश्न विचारा ना? पेशवाई आणि जातीवर का येता? जातीयवाचक प्रश्न याच नेत्यांना का पडतात? असे म्हणत आशिष शेलार यांनी प्रश्नांचा भडीमार केला.
आकाच्या डोक्यात फक्त जात, धर्म, लिंग भेद
आशिष शेलार म्हणाले की, हेच मुर्शीदाबादच्या घटनेच्या विरोधातल्यांचे आका आहेत. हेच पहलगामच्या घटनेविरोधात बोलणाऱ्यांचे आका आहेत. हिंदू म्हणून मारलं हीच त्यांना भीती आहे. त्यामुळे आता विभाजन कसं करायचं? असा प्रश्न त्यांना पडला आहे. परंतु हा हिंदू-मुस्लीम असा मुद्दा नाही, तर हा देशावरील हल्ला आहे, हे त्यांना कळत नाही. या आकाच्या डोक्यात फक्त जात, धर्म, लिंग भेद हेच असतं, असा गंभीर आरोपही आशिष शेलार यांनी केला.
हेही वाचा – Chandrahar Patil : यापुढेही भेट घेण्यात…; उदय सामंतांच्या घरी स्नेहभोजनानंतर चंद्रहार पाटलांची प्रतिक्रिया
Comments are closed.