Weight Loss Tips : वेट लॉससाठी केव्हा चालणे फायदेशीर ?

वेट लॉस करणे हे अनेकांचे ध्येय असते. यासाठी वर्कआऊट करणे, जिमला जाणे असे अनेक पर्याय अवलंबले जातात. मात्र वजन कमी करण्याचा सर्वोत्तम मार्ग म्हणजे नियमित चालणे. परंतु चालण्याची वेळ देखील खूप महत्त्वाची आहे. योग्य वेळी चालणे हेदेखील महत्त्वाचे आहे. जेणेकरून तुम्हाला चालण्याचे फायदे मिळतील. पण तुम्हाला माहिती आहे का चालण्याची योग्य वेळ कोणती? बऱ्याच लोकांच्या मनात हा प्रश्न असतो की त्यांनी जेवणापूर्वी चालावे की जेवणानंतर. दोन्ही वेळी चालण्याचे वेगवेगळे फायदे आहेत, पण वजन कमी करण्यासाठी कोणती वेळ जास्त प्रभावी आहे? याचविषयी आजच्या या लेखातून जाणून घेऊयात.

जेवणापूर्वी चालण्याचे फायदे

चरबी जाळण्यास उपयुक्त

रिकाम्या पोटी चालल्याने शरीरात साठलेली चरबी लवकर जाळते. जेव्हा तुम्ही जेवणापूर्वी चालता तेव्हा शरीर ग्लायकोजेन (कार्बोहायड्रेट्समधून मिळणारी ऊर्जा) ऐवजी थेट ऊर्जेसाठी चरबी वापरते, ज्यामुळे वजन कमी होण्यास मदत होते.

पचनक्रिया सुधारते

सकाळी उठून रिकाम्या पोटी चालल्याने पचनशक्ती सक्रिय होते , ज्यामुळे दिवसभर कॅलरीज बर्न करण्याची प्रक्रिया जलद राहते.

रक्तातील साखर नियंत्रणात ठेवते

जेवणापूर्वी चालणे मधुमेही रुग्णांसाठी फायदेशीर ठरू शकते, कारण ते इन्सुलिन संवेदनशीलता सुधारते आणि रक्तातील साखरेची पातळी नियंत्रित ठेवते.

जेवणानंतर चालण्याचे फायदे

पचनसंस्था मजबूत होते

जेवणानंतर 15-30 मिनिटे हलके चालणे पचनसंस्थेचे कार्य चांगले करण्यास मदत करते . यामुळे गॅस, अ‍ॅसिडिटी आणि बद्धकोष्ठता यासारख्या समस्या दूर होतात.

रक्तातील साखरेची पातळी कमी करते

जेवल्यानंतर चालल्यामुळे शरीराला ग्लुकोजचा वापर चांगल्या प्रकारे होण्यास मदत होते, ज्यामुळे रक्तातील साखरेची पातळी वाढत नाही. मधुमेहाच्या रुग्णांसाठी हे विशेषतः फायदेशीर आहे.

कॅलरीज बर्न करण्यास मदत करते

जेवल्यानंतर चालल्याने शरीरात साठलेल्या अतिरिक्त कॅलरीज बर्न होतात, ज्यामुळे वजन नियंत्रणात राहते.

वजन कमी करण्यासाठी चालणे कधी जास्त फायदेशीर?

दोन्ही वेळी चालण्याचे फायदे असले तरी, जेवणापूर्वी चालणे वजन कमी करण्यासाठी अधिक प्रभावी मानले जाते, कारण-

रिकाम्या पोटी चालल्याने फॅट्स जलद जाळण्यास मदत होते.
पचनक्रिया सुधारते, ज्यामुळे दिवसभर कॅलरीज बर्न होण्यास मदत होते.
भूक नियंत्रित होते, ज्यामुळे जास्त खाणे टाळण्यास मदत होते.
मात्र जर तुम्हाला गॅस किंवा अ‍ॅसिडिटी सारख्या समस्या असतील तर जेवणानंतर 15-20 मिनिटे चालणे फायदेशीर ठरू शकते.

किती वेळ आणि कसे चालावे?

सकाळी रिकाम्या पोटी 30-45 मिनिटे जलद चालणे .
जेवणानंतर- 15 -20 मिनिटे आरामदायी चालणे.

हेही वाचा : Jackfruit Biryani Recipe : फणसाची बिर्याणी


संपादित – तनवी गुडे

Comments are closed.