घराचा दवाखाना नको

घर म्हटलं की पसारा आलाच. त्यातही जर घऱात आजारी व्यक्ती असेल तर घरभर त्याची औषधं पडलेली दिसतात. कारण ज्या ज्या रुममध्ये पेशंट ये जा करतो त्या त्या ठिकाणी तो बऱ्याचवेळा औषध सोबत ठेवतो.

जर तो हॉलमध्ये जेवला तर जेवल्यानंतर टेबलावर औषध ठेवतो. त्यानतंर जेव्हा तो बे़रुममध्ये जातो तेव्हा त्याच गोळ्याचं पाकीट, सिरपची बाटली. बीपी मशिन , ड्रॉप, कापूस, बँडेज तो बेडरुममध्ये ठेवतो.

यामुळे हॉलपासून बेडरुम ते किचनमध्येही कधी संपलेली सिरपची बाटली, गोळ्यांचे रॅपर, ड्रॉपच्या बॉटल अस्ताव्यस्त पसरलेल्या दिसतात.

त्यातही जर संबंधित व्यक्तीला संसर्गजन्य आजार झालेला असेल तर त्याने ज्या ज्या रुममध्ये येजा केली .तिथे बसला. अशा जागांवरही त्याचे विषाणून लपलेले असतात.

जर एखादी निरोगी व्यक्ती त्या ठिकाणी गेला आणि तिने त्या जागेला स्पर्शही केला तरी त्याला संसर्ग होऊ शकतो.

त्यामुळे आजारी व्यक्तींनी घरात दवाखाना न मांडता घरातील एका रुममध्ये मेडीकल बॉक्समध्य़े सर्व औषध ठेवावी. जेणेकरून इतरांना त्याचा त्रास होणार नाही.

तसेच गरज असेल तेव्हा औषध शोधावी लागणार नाहीत. ती कोणत्या बॉक्समध्ये आहेत ते सगळ्यांना माहीत असल्याने शोधाशोध करावी लागणार नाही.


हेही वाचा : दरवाजा नेमप्लेट: नेमपलेट काशी असावी?

Comments are closed.