RCB पॉइंट्स टेबलमध्ये सगळ्यात वरती, CSK पोहोचली अखेरच्या स्थानी!

दिल्ली कॅपिटल्सविरुद्ध कृणाल पांड्या आणि विराट कोहली यांनी शानदार फलंदाजी केली. दोघांनीही अर्धशतके झळकावल्याने रॉयल चॅलेंजर्स बंगळुरू ने रविवारी अरुण जेटली स्टेडियमवर दिल्ली कॅपिटल्स वर सहा विकेट्सने मात केली. यासह आरसीबी पॉइंट्स टेबलमध्ये अव्वल स्थानावर पोहोचले.

आरसीबीच्या गोलंदाजांमध्ये, भुवनेश्वर कुमारचे 3-33, जोश हेझलवूडचे 2-36 आणि कृणाल आणि सुयश शर्मा यांच्या दमदार कामगिरीमुळे डीसीला 162 धावा करता आल्या.

20 षटकांत 163 धावांचा पाठलाग करताना, आरसीबीला चांगली सुरुवात करता आली नाही. आरसीबीने अवघ्या 26 धावांत त्यांचे तीन बळी गमावले. दिल्ली कॅपिटल्सने सामन्यावर आपली पकड मजबूत केली, परंतु कृणालने 47 चेंडूत पाच चौकार आणि चार षटकारांसह 73 धावांची शानदार खेळी करत डीसीच्या आशा धुळीस मिळवल्या.

दुसऱ्या टोकाला विराट कोहलीकडूनही पंड्याला चांगली साथ मिळाली. कोहलीने 47 चेंडूत 51 धावा केल्या. दोघांनी चौथ्या विकेटसाठी 119 धावांची भागीदारी केली. टिम डेव्हिडने पाच चेंडूत नाबाद 19 धावा करत आरसीबीला विजय मिळवून दिला.

जेकब बेथेलने दुसऱ्या षटकात मिचेल स्टार्कच्या सलग चेंडूंवर षटकार आणि चौकार मारत आरसीबीला शानदार सुरुवात दिली, परंतु बेथेल एका छोट्या खेळीत अक्षर पटेलचा बळी ठरला. देवदत्त पडिक्कल क्रीजवर आला. पण, तोही पटेलच्या चेंडूवर पॅव्हेलियनमध्ये परतला. दोन विकेट पडल्यानंतर कर्णधार रजत पाटीदार क्रीजवर पोहोचला, पण धावबाद झाला आणि त्याला पॅव्हेलियनमध्ये परतावे लागले.

पॉवर-प्लेमध्ये डीसीच्या पकडीमुळे कोहली आणि पंड्याला मोकळेपणाने खेळण्याची संधी मिळाली नाही. कोहलीने हळूहळू त्याची लय परत मिळवली. कुलदीप यादवला लक्ष्य करण्यात आले. विराटने कुलदीपच्या चेंडूवर चौकार मारून आपले हेतू स्पष्ट केले.

Comments are closed.