‘कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता…’, शाहिद आफ्रिदीचं नाव घेताच असदुद्दीन ओवैसी भडकले
शाहिद आफ्रिदीवरील पहलगम दहशतवादी हल्ला असदुद्दीन ओवैसी: पहलगाम हल्ल्यावर प्रतिक्रिया देताना पाकिस्तानी क्रिकेटपटू शाहिद आफ्रिदीने अकलेचे तारे तोडलेत. भारतच हल्ले घडवून स्वतःच्या लोकांना मारतो असं बेताल वक्तव्य करत शाहिद आफ्रिदीने भारतावर गंभीर आरोप केले. तर हे विधान करुन आफ्रिदीने एकप्रकारे पाकिस्तानमध्ये दहशतवाद्यांचं समर्थन केले. तर एमआयएचे खासदार असदुद्दीन ओवैसींनी शाहीद आफ्रिदीला चांगलेच खडेबोल सुनावलेत. कोण आफ्रिदी? कोणत्या जोकरचं नाव घेता, असा टोला लगावत ओवैसींनी आफ्रिदीवर टीका केलीय.
यासोबतच, ओवेसी यांनी पाकिस्तानला फायनान्शियल अॅक्शन टास्क फोर्सच्या ‘ग्रे लिस्ट’मध्ये टाकण्याची मागणी केली. ते म्हणाले की, काय करायचे आणि काय करायचे नाही हे सरकारचे आहे. माझी मागणी अशी आहे की पाकिस्तानला पुन्हा एकदा FATF च्या ग्रे लिस्टमध्ये टाकावे. हे महत्वाचे आहे. कोणत्या ना कोणत्या सबबीखाली पैसे उकळून पाकिस्तान दहशतवादाला पोसत आहे.
शाहिद आफ्रिदी काय म्हणाला?
आफ्रिदीने पाकिस्तानी माध्यमांसमोर भारताविरुद्ध विष ओकले होते. हल्ला होताच, 10 मिनिटांतच नवी भारताने हल्ल्यासाठी पाकिस्तानला जबाबदार धरले, असा हास्यास्पद दावा त्यांनी केला होता. इस्लाम आपल्याला शांतीने राहायला शिकवतो. पाकिस्तान अशा कृतींना पाठिंबा देत नाही. भारताने स्वतःला दोषी ठरवावे. तिथे फटाके फुटले तरी त्याचा दोष पाकिस्तानवर टाकला जातो.
यानंतर आफ्रिदीने भारतीय माध्यमांवरही निराधार आरोप केले. तो म्हणाला, ‘आश्चर्य म्हणजे हल्ल्याच्या एका तासाच्या आत भारताचा मिडिया बॉलिवूड झाला. मला धक्का बसला, ते ज्या प्रकारच्या गोष्टी सांगत होते आणि बोलत होते त्यावर मी एन्जॉय करत होतो. प्रत्येक टीव्ही चॅनेल कोणत्याही पुराव्याशिवाय उघडपणे पाकिस्तानवर आरोप करत होते. आफ्रिदी इथेच थांबला नाही, तर त्याने माध्यमांशी बोलताना भारतीय सैन्याबद्दलही बेताल आणि निराधार वक्तव्य केली.
हे ही वाचा –
अधिक पाहा..
Comments are closed.