विजय वडेट्टीवार म्हणाले, दहशतवाद्यांनी पर्यटकांना धर्म विचारला नाही; नितेश राणेंचं चवताळून प्रत

Nitesh Rane on Vijay Wadettiwar : काश्मीरमधील पहलगामजवळील बैसरन येथे 22 एप्रिल रोजी दहशतवाद्यांनी पर्यटकांवर बेछूट गोळीबार केला, ज्यात 26 जणांचा मृत्यू झाला. या हल्ल्यामुळे संपूर्ण देशात खळबळ उडाली आहे. हल्ल्यातून बचावलेल्या काही पर्यटकांनी माध्यमांसमोर सांगितले की, चार दहशतवाद्यांनी हल्ला केला आणि त्यांनी गोळीबार करण्यापूर्वी पर्यटकांचा धर्म विचारला. “तुम्ही हिंदू आहात का?” असा प्रश्न विचारून, जे हिंदू होते त्यांच्यावरच गोळ्या झाडल्या गेल्याचे सांगितले. या प्रकरणावर सध्या विविध प्रतिक्रिया उमटत आहेत. यावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी दहशतवादी हल्ला करताना लोकांशी बोलतात का? त्यांच्या धर्माची चौकशी करत बसतात का?” काही पर्यटक म्हणत आहेत की हल्लेखोरांनी धर्म विचारला, तर काहींचं म्हणणं आहे की असं काही घडलंच नाही, असे वक्तव्य केले. आता विजय वडेट्टीवार यांच्या वक्तव्यावर मंत्री नितेश राणे यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

नेमकं काय म्हणाले नितेश राणे?

नितेश राणे म्हणाले की, ज्या काँग्रेसने भगवा आतंकवाद असा उल्लेख केला होता. म्हणून दहशतवादाला रंग नाही, असे वक्तव्य वडेट्टीवार कसे करू शकतात? त्यांनी काँग्रेसच्या नेत्यांची वक्तव्य ऐकावीत. त्यांची मानसिकता ही तुष्टीकरण व हिंदूंचा द्वेष करण्याची आहे. त्यांच्यावर देशद्रोहाचं कलम लावावं, असे म्हणत त्यांनी संताप व्यक्त केलाय.

योगेश कदम माझे मित्र : नितेश राणे

दरम्यान, दापोलीत दोन गटात झालेल्या वादाच्या मुद्द्यावरून आता महायुतीतील दोन मंत्र्यांमध्येच संघर्षाची ठिणगी पडली आहे. कॅबिनेट मंत्री नितेश राणे यांनी दापोलीत जाऊन गृह राज्यमंत्री योगेश कदम यांच्यावर नाव न घेता हल्ला चढवला. राणेंनी केलेल्या टिकेनंतर कदमही चांगलेच भडकले. माझ्या मतदारसंघात येऊन मला शहाणपणा शिकवायची गरज नाही, असे म्हणत गृह राज्य मंत्री योगेश कदम यांनी मंत्री नितेश राणे यांना खडेबोल सुनावले. याबाबत विचारले असता नितेश राणे म्हणाले की, ते माझे मित्र आहेत. दुसऱ्यावर जाणारा बाण त्यांनी अंगावर का घेतला? हे मला माहिती नाही. आपले हिंदूत्ववादी सरकार आहे. जेव्हा दंगल घडली तेव्हा विटा व दगड कुणी मारले? याविरुद्ध आपण हिंदू म्हणून भूमिका घ्यायला हवी. पक्षाच्या चौकटीत राहून नये. हिंदू म्हणून एकत्र येऊन खांद्याला खांदा लावून लढण्याची गरज आहे, असे त्यांनी म्हटले.

https://www.youtube.com/watch?v=38xd7o9uh38

आणखी वाचा

मराठी and Devendra Fadnavis : राज्यातील पाकिस्तानच्या नागरिकांवरून शिंदे आणि फडणवीसांचं परस्परविरोधी वक्तव्य; आता खुद्द गृहमंत्र्यांनीच दिलं स्पष्टीकरण; म्हणाले…

अधिक पाहा..

Comments are closed.