भायखळा येथे बेकरीत आग; चार जण होरपळले

भायखळा पूर्व येथे आज संध्याकाळी बेकरीला लागलेल्या आगीत चार जण जखमी झाले. त्यांच्यावर मसिना आणि भाटिया रुग्णालयात उपचार सुरू आहेत. अग्निशमन दलाच्या जवानांनी तत्काळ घटनास्थळी पोहोचून एका तासात आगीवर नियंत्रण मिळवले. दरम्यान, आगीचे कारण अद्याप समजू शकलेले नाही. भायखळा (पूर्व) येथील सुपर बेकरीमध्ये आज संध्याकाळी 5 वाजून 20 मिनिटांच्या सुमाराला आग लागली. या आगीत चार जण अडकले. यात जयेश पारिख (46), जुबेर सिद्दिकी (25), जावेद मोहम्मद (23) आणि शहारीयार (36) हे चार जण होरपळले. त्यांना तत्काळ नजीकच्या मसीना रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. आगीची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या जवानांनी तात्काळ घटनास्थळी पोहोचून बचावकार्य सुरू केले. जवानांनी सुमारे एक तासाच्या अथक प्रयत्नानंतर आगीवर नियंत्रण मिळवून आग संपूर्णपणे नियंत्रणात आणली.
Comments are closed.