स्पेन, पोर्तुगालमध्ये ब्लॅकआऊट; मेट्रो, विमानसेवा ठप्प, इंटरनेट, मोबाईलही बंद

स्पेन आणि पोर्तुगालमध्ये वीजपुरवठा खंडित झाल्याने सर्वत्र ब्लॅकआऊटसारखी स्थिती निर्माण झाली आहे. वीजपुरवठा खंडित झाल्याने इंटरनेट, विमान, भुयारी मार्ग, मेट्रो आणि ट्रेन या सेवा पूर्णपणे ठप्प झाल्या आहेत. त्यामुळे नागरिकांचे प्रचंड हाल झाले. रेल्वे स्थानकांमध्ये प्रवाशी वाट बघत ताटकळलेले दिसले.
अचानक वीजपुरवठा खंडित झाल्याचा फटका फ्रान्समधील काही शहरांनाही बसला. वीजपुरवठा नेमका कशामुळे खंडित झाला याबाबत अद्याप माहिती मिळू शकलेली नाही. वीजपुरवठा खंडित झाल्यामुळे वार्षिक क्ले कोर्ट टेनिस स्पर्धा माद्रित ओपनवरही त्याचा परिणाम झाला. दरम्यान, स्पेन आणि पोर्तुगालमध्ये झालेल्या ब्लॅकआऊटमागे सायबर हल्ला कारणीभूत असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली असून तपास यंत्रणांनी त्यादृष्टीने तपासही सुरू केला आहे.
Comments are closed.