Milk for Skin Care : चेहऱ्यावर दूध लावण्याचे साईड इफेक्ट्स
त्वचा निरोगी आणि चमकदार बनवण्यासाठी अनेक प्रकारची उत्पादने वापरली जातात किंवा घरगुती उपायांचा अवलंब केला जातो. यामध्ये कच्चे दूध देखील समाविष्ट आहे. हे आरोग्यासाठी तसेच त्वचेसाठी फायदेशीर आहे, म्हणूनच याचा वापर त्वचा अधिक तेजस्वी करण्यासाठी देखील केला जातो. दुधात व्हिटॅमिन ए, डी, बी 12, कॅल्शियम, लॅक्टिक अॅसिड आणि प्रथिने आढळतात जे त्वचेचे पोषण करण्यास मदत करतात. त्वचेवर दूध लावल्याने काय होते, यासाठीच जाणून घेऊयात कच्चे दूध चेहऱ्यावर लावण्याचे फायदे आणि तोटे
चेहऱ्यावर कच्चे दूध लावण्याचे फायदे
तुमची त्वचा हायड्रेट ठेवते
कच्चे दूध त्वचेचा ओलावा टिकवून ठेवण्यास मदत करते. कोरडी त्वचा असलेल्या व्यक्तींसाठी, दूध हे नैसर्गिक मॉइश्चरायझर म्हणून काम करते. ज्यामुळे त्वचा मऊ आणि कोमल राहण्यास मदत होते.
त्वचा स्वच्छ होते
कच्च्या दुधामध्ये असलेले लॅक्टिक अॅसिड त्वचेवरील डेड सेल्स काढून टाकण्यास मदत करते. हे स्क्रबसारखे काम करते, जे चेहऱ्यावर साचलेली धूळ आणि घाण काढून टाकण्यास मदत करते, ज्यामुळे त्वचा स्वच्छ दिसते.
चमकणारी त्वचा
कच्चे दूध त्वचेवरील डाग आणि टॅनिंग दूर करते. याच्या नियमित वापरामुळे चेहऱ्यावर नैसर्गिक चमक येते. विशेषतः ज्यांची त्वचा कोरडी आहे अशा व्यक्तींकरता कच्चे दूध अधिक फायदेशीर मानले जाते.
सनबर्नपासून सुटका
कच्चे दूध उन्हाच्या जळजळीपासून आराम देण्यासाठी आणि चिडचिड कमी करण्यासाठी देखील उपयुक्त ठरू शकते. तसेच, त्यात असलेले व्हिटॅमिन ए आणि इतर पोषक तत्व त्वचेला वृद्धत्वाच्या खुणांपासून वाचवण्यासाठीही मदत करतात.
चेहऱ्यावर कच्चे दूध लावण्याचे साईड इफेक्ट्स
ऍलर्जीचा धोका
काही लोकांना दुधाची ऍलर्जी असू शकते, ज्यामुळे त्वचेवर लालसरपणा, खाज सुटणे किंवा पुरळ उठणे अशा समस्या निर्माण होतात. अशा परिस्थितीत, कच्चे दूध लावण्यापूर्वी पॅच टेस्ट करणे आवश्यक आहे. याशिवाय तेलकट त्वचेवर अतिरिक्त तेल आल्याने ब्लॅकहेड्स आणि पिंपल्सची समस्या देखील वाढू शकते. कधीकधी यामुळे त्वचेच्या संसर्गाचा धोका देखील निर्माण होऊ शकतो.
जर तुम्हीही तुमच्या चेहऱ्यावर कच्चे दूध लावत असाल तर आठवड्यातून दोन पेक्षा जास्त वेळा ते वापरू नये. कारण त्याचा जास्त वापर केल्याने त्वचेशी संबंधित समस्या देखील उद्भवू शकतात. तुम्ही कापसाच्या मदतीने कच्चे दूध चेहऱ्यावर लावू शकता. याशिवाय, तुम्ही कच्चे दूध-मध, कच्चे दूध-बेसन किंवा हळद आणि कच्चे दूध यांचे फेसपॅक बनवून ते चेहऱ्याला लावू शकता.
हेही वाचा : मिनीट ताक: उनाला कार कूलगर, बन्वा पुडिना तव
संपादित – तनवी गुडे
Comments are closed.