सत्ताधाऱ्यांना मुंबईकरांचे जिणे मुश्किल करायचे आहे, आदित्य ठाकरे यांचा हल्ला

दुप्पट दरवाढीला आमचा विरोध आहे. बेस्ट बसेसची संख्या आधीच रोडावलीय, महत्त्वाचे मार्ग बंद केलेत. आता दरवाढ केली तर बेस्टवर विपरीत परिणाम होईल. इलेक्ट्रिक बसेसची संख्या वाढवा, दर्जा सुधारा आणि चांगली सेवा द्या. बेस्ट वाचवा.
मुंबईतील सामान्य माणसाची जीवनवाहिनी असलेल्या बेस्ट बससेवेकडे सत्ताधाऱ्यांकडून गेल्या 2-3 वर्षांत मुद्दाम दुर्लक्ष केले जातेय. आता तर बेस्टची दुप्पट दरवाढ करून मुंबईकरांचे रोजचे जगणेच मुश्किल करण्याचा सत्ताधाऱ्यांचा विचार दिसतोय. जगातील सर्वात स्वस्त शहरी बससेवा असलेल्या आणि लाखो मुंबईकरांना सेवा देणाऱ्या बेस्टचे हे अधःपतन आम्ही सहन करणार नाही, असे शिवसेना नेते, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी ‘एक्स’वरून ठणकावले.
Comments are closed.