‘धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’, ‘त्या’ वक्तव्यावरुन विजय वडेट्टी
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;"> <एक शीर्षक ="नागपूर" href ="https://marathi.tezzbuzz.com/news/nagpur" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">नागपूर: जम्मू काश्मीरमधील 22 एप्रिल रोजी जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे दहशतवाद्यांनी केलेल्या भ्याड हल्ल्यात 26 पर्यंटकांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या दहशतवाद्यांनी धर्म विचारून त्यांच्यावरती गोळ्या झाडल्याची धक्कादायक माहिती हल्ल्यातील पीडितांनी दिली होती. त्यावरून एकीकडे देशभरात संतापाची लाट उसळली आहे. अशातच दुसरीकडे या मुद्यावरून राजकारणाला देखील तोंड फुटलं. याचदरम्यान, राज्यातील काँग्रेसचे नेते विजय वडेट्टीवार यांनी मात्र दहशतवाद्यांनी धर्म विचारून त्यांच्यावरती गोळ्या झाडल्याच्या या दाव्यांवर प्रश्नचिन्ह उपस्थित केले आहेत. ‘धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का?’ असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी केला होता. त्यानंतर वडेट्टीवार यांच्यावरती टीका झाल्यानंतर यावरती स्पष्टीकरण दिलं आहे.
स्पष्टीकरण देताना काय म्हणालेत वडेट्टीवार?
विजय वडेट्टीवार यांनी केलेल्या वक्तव्यावरती सत्ताधारी पक्षातील नेत्यांनी टीका केल्यानंतर त्यांनी स्पष्टीकरण देताना म्हटलं की, माझे वक्तव्य तोडून मोडून दाखवण्यात आले आहे. मागचं पुढचं दाखवण्यात आलं नाही. अर्धवट दाखवण्याच्या भरोशावर काहीतरी वेगळं वातावरण देशात निर्माण करून काँग्रेसला अडचणीत आणण्याचं काम काही ठराविक मीडिया जाणून बुजून करत आहे. आमची भूमिका स्पष्ट आहे जी राहुलजी आणि मल्लिकार्जुन खर्गे यांनी सांगितलेली आहे. ती आमच्या पक्षाची आहे. मी काल बोलताना असे बोलललो होतो, पहिल्यांदा असं होत आहे की, अतिरेक्यांना एवढा वेळ मिळाला. तेवढेच दाखवलं गेलं. त्यापुढे बोललो माझी सगळ्या चॅनलला विनंती आहे की पूर्ण दाखवा यावेळेस अतिरेक्यांना शिकवून पाकिस्तानने पाठवले, असंही पुढे विजय वडेट्टीवार म्हणाले आहेत.
देशाला अस्थिर करण्यासाठी, देशातील दोन सामुदायांना आपापसात लढवण्यासाठी आणि देशाचं नुकसान करण्यासाठी पाकिस्तानने हे कृत्य केलं आहे. भारत देशाला अस्थिर करण्यासाठी प्रयत्न करत असलेल्या शक्तींवर कारवाई करणाऱ्या केंद्र सरकारसोबत काँग्रेस उभी असेल असंही त्यांनी पुढे म्हटलं आहे. धर्म विचारून मारलं गेलं. हा देश कमजोर करायचा प्रयत्न केला गेला. एकात्मतेला, सार्वभौमत्वला, अखंडतेला खिंडार पाडायचं होतं म्हणून त्यांनी असं केलं, अतिरेक्याला कोणता धर्म नसतो. हे मी बोललो होतो. त्याच्या मागे पाकिस्तानचा जो उद्देश होता तो भारताला कमजोर करण्याचा होता. हा हल्ला भारतावरचा होता, म्हणून शिकवून पाठवलं. 26 वर्षानंतर पर्यटकांवर हल्ला होता. हे लपवण्याकरता माझं भाषण तोडून मोडून दाखवण्यात आलं असल्याचं विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
मी माफी मागतोय. मीडियाला माझी विनंती आहे की भाषण पूर्ण दाखवा.अर्धवट दाखवू नका. सरकारचं अपयश लपवण्यासाठी काहीतरी संभ्रम निर्माण करण्याचं काम होऊ नये, माझी भूमिका स्पष्ट होती. अतिरेकी पहिल्यांदा धर्म विचारत आहे. अतिरेक्यांना एवढा वेळ मिळाला शिकवून पाठवलं गेलं. देशातील दोन धर्मांमध्ये भांडण लावण्याचे काम करण्याचा आणि देश कमजोर करण्याचं काम पाकिस्तानचं होतं, असं माझं मत आहे, असंही पुढे विजय वडेट्टीवार यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले होते विजय वडेट्टीवार?
धर्म विचारून गोळ्या घालण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का? मारणाऱ्याच्या कानात जाऊन तू हिंदू आहेस की मुस्लिम असं विचारण्याइतपत वेळ दहशतवाद्यांकडे असतो का? या प्रकरणात वेगवेगळे लोक वेगवेगळे दावे करत आहेत. काही जण असं घडल्याचं सांगत आहेत. तर काही जण असं घडलं नसल्याचं सांगत आहेत, असेही वडेट्टीवार म्हणाले होते.
पहलगाममध्ये जे काही घडलं आहे, त्याची जबाबदारी सरकारनं घेतली पाहिजे. तिथे सुरक्षा व्यवस्था का नव्हती, तुमची गुप्तचर यंत्रणा काय काम करत होती. 200 किलोमीटर आत येऊन दहशतवाद्यांनी लोकांना कसं काय मारलं? याबाबत कुणी काही बोलत नाही आहे. या सर्व गोष्टी ठरवून केल्या जात आहेत. सरळ सरळ दहशतवाद्यांना पकडून त्यांच्यावर कारवाई करा, अशाप्रकारच्या बाता मारून मुद्द्याला भरकटवणं चुकीचं आहे, कुठलाही धर्म नसतो, दहशतवाद्यांनी देशावर हल्ला केला आहे. त्यामुळे त्यांना पकडून कठोरात कठोर कारवाई केली पाहिजे. संपूर्ण देशभरात हीच भावना आहे. मात्र लोक वेगवेगळ्या गोष्टी करत आहेत, असं वडेट्टीवार म्हणाले होते.
Comments are closed.