1 मेपासून एटीएममधून पैसे काढणे महागणार, एकदा पैसे काढल्यास किती चार्ज लागणार?
नवीन एटीएम कॅश पैसे काढण्याचा नियम 2025: जर तुम्ही देखील वारंवार ATM मधून पैसे काढत असाल तर तुमच्यासाठी एक महत्त्वाची बातमी आहे. 1 मे 2025 पासून, मोफत मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढणे महाग होणार आहे. रिझर्व्ह बँकेने (RBI) एटीएम शुल्कात वाढ करण्यास मान्यता दिली आहे. याचा अर्थ एटीएममधून मोफत पैसे काढण्याची मर्यादा संपल्यानंतर तुम्ही प्रत्येक वेळी पैसे काढता तेव्हा तुमच्या खिशावर थोडा जास्त भार पडेल.
एटीएममधून पैसे काढण्याचे शुल्क किती वाढलं?
आतापर्यंत, मोफत व्यवहार मर्यादा संपल्यानंतर एटीएममधून पैसे काढण्यासाठी 21 रुपये शुल्क आकारले जात होते. परंतु 1 मे 2025 पासून प्रत्येक अतिरिक्त व्यवहारासाठी 23 रुपये द्यावे लागतील. म्हणजेच जर तुम्ही मोफत मर्यादेनंतर एटीएममधून पैसे काढले तर तुम्हाला प्रत्येक वेळी 2 रुपये जास्त द्यावे लागतील. जे लोक महिन्यातून अनेक वेळा पैसे काढण्यासाठी एटीएम वापरतात त्यांच्यासाठी हा खर्च वाढेल.
मोफत व्यवहार मर्यादा जैसे थे
मोफत मर्यादेबाबत कोणताही बदल करण्यात आलेला नाही. याचा अर्थ असा की ग्राहक अजूनही दरमहा त्यांच्या बँकेच्या एटीएममधून पाच वेळा मोफत व्यवहार करू शकतात. याशिवाय, इतर कोणत्याही बँकेच्या एटीएममधून 3 वेळा मोफत व्यवहारांची सुविधा मेट्रो शहरांमध्ये आणि 5 वेळा मोफत व्यवहारांची सुविधा नॉन-मेट्रो शहरांमध्ये उपलब्ध असणार आहे. जर तुम्ही ठरवून दिलेल्या मर्यादेपेक्षा जास्त वेळेला पैसे काढले तरच नवीन शुल्क लागू होईल.
लहान बँकांच्या ग्राहकांवर जास्त परिणाम
एटीएम शुल्कात वाढ झाल्याने सर्वात जास्त परिणाम लहान बँकांच्या ग्राहकांवर होईल, असे तज्ज्ञांचे मत आहे. लहान बँकांकडे कमी एटीएम असतात आणि ते मोठ्या बँकांच्या नेटवर्कवर अवलंबून असतात. अशा परिस्थितीत, जर मोफत व्यवहाराची मर्यादा संपली तर या ग्राहकांना प्रत्येक वेळी जास्त पैसे द्यावे लागू शकतात. अशा परिस्थितीत, जास्त शुल्क टाळण्यासाठी, काही ग्राहक त्यांची बँक बदलण्याचा विचार करू शकतात जेणेकरून ते अधिक वारंवार मोफत व्यवहारांची सुविधा मिळवू शकतील.
एटीएम शुल्क वाढवण्याचे कारण काय?
बँका आणि थर्ड पार्टी एटीएम ऑपरेटर (जसे की व्हाईट-लेबल एटीएम कंपन्या) बऱ्याच काळापासून शुल्क वाढवण्याची मागणी करत होते. त्यांनी एटीएम चालवण्याचा खर्च लक्षणीयरीत्या वाढला आहे आणि त्यांना तोटा होत आहे असे सांगितले होते. यावर, नॅशनल पेमेंट्स कॉर्पोरेशन ऑफ इंडिया (NPCI) ने आरबीआयला शुल्क वाढवण्याची शिफारस केली होती, ती आता मंजूर करण्यात आली आहे. त्यामुळे हा नवीन नियम 1 मे 2025 पासून लागू होईल.
अतिरीक्त पैसे देणं कसं टाळता येऊ शकतं?
जर तुम्ही महिन्यातून एकदा किंवा दोनदाच एटीएममधून पैसे काढत असाल तर तुम्हाला काळजी करण्याची गरज नाही. पण जे लोक एटीएममधून वारंवार पैसे काढतात त्यांच्यासाठी आम्ही काही सोप्या टिप्स आहेत.
– फक्त मोफत मर्यादेत व्यवहार करा.
– तुमच्या बँकेच्या एटीएमचा जास्तीत जास्त वापर करा.
– रोख रकमेची गरज कमी करण्यासाठी डिजिटल पेमेंट, यूपीआय किंवा मोबाईल वॉलेटसारखे पर्याय अधिक वापरा.
अशाप्रकारे, तुम्ही नवीन वाढलेले शुल्क सहजपणे टाळू शकता.
अधिक पाहा..
Comments are closed.