अडीच लाख लोकांना अमेरिकेतून हाकलले, ट्रम्प यांना उद्या होणार शंभर दिवस पूर्ण

अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांना उद्या, 30 एप्रिल रोजी सत्तेत येऊन 100 दिवस पूर्ण होतील. ट्रम्प यांनी 20 जानेवारी 2025 रोजी दुसऱ्यांदा राष्ट्राध्यक्षपदाची शपथ घेतली होती. या 100 दिवसांत त्यांनी जे काही निर्णय घेतले आहेत त्याची संपूर्ण जगात खळबळ उडाली आहे. दुसऱ्यांदा सत्तेत आलेल्या ट्रम्प सरकारने बेकायदेशीर राहणाऱ्या जवळपास अडीच लाख लोकांना अमेरिकेबाहेर हाकलले आहे. यामध्ये 332 भारतीयांचा सुद्धा समावेश आहे.
अमेरिकेने 2 कोटी बेकायदेशीर स्थलांतरितांना हद्दपार करण्याची योजना सुरू केली. अमेरिका फर्स्ट अशी हाक देणाऱ्या ट्रम्प यांनी अन्य देशांतील नागरिकांना देशाबाहेर काढण्यासाठी कठोर निर्णय घेतले आहेत. बेकायदेशीर स्थलांतरितांच्या अटकेत 627 टक्के वाढ झाली असून सीमा ओलांडण्याचे प्रमाण 94 टक्क्यांनी कमी झाल्याचे अमेरिकन प्रशासनाने म्हटले आहे.
ट्रम्प सरकारने डॉज विभागातून सरकारी नोकऱ्या मोठ्या प्रमाणात कमी केल्या आहेत. शिक्षण, आरोग्य आणि ऊर्जा विभागांसह 48 एजन्सींमध्ये 50,000 हून अधिक संघीय कर्मचाऱ्यांना कामावरून काढून टाकण्यात आले. तसेच 77,000 कर्मचाऱ्यांनी स्वेच्छेने राजीनामा दिल्याचे अमेरिकन प्रशासनाने म्हटले आहे.
Comments are closed.