हिंदुस्थानी व्हॉलीबॉल संघाचा पाकिस्तानात जाण्यास नकार

पहलगाममधील भ्याड हल्ल्यानंतर पाकिस्तानला जिथे जिथे कोंडीत पकडता येईल तिथे पकडण्याचा प्रयत्न हिंदुस्थान करत आहे. पाकिस्तानमधील इस्लामाबाद येथे आशियाई व्हॉलीबॉल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे. मात्र आता हिदुस्थानी संघाने या दौऱयावर जाण्यास नकार दिला आहे. याआधी फक्त हिंदुस्थानचा क्रिकेट संघ पाकिस्तान दौऱयावर जात नव्हता. आता व्हॉलीबॉल संघाने जाण्यास नकार दिल्याने पाकिस्तानला मोठा धक्का बसलाय.
ही स्पर्धा 28 मेपासून सुरू होणार आहे. या स्पर्धेसाठी हिंदुस्थानातील 22 खेळाडू व आठ कोचिंग स्टाफमधील व्यक्ती जाणार होते. मात्र या स्पर्धेला आता एक महिना बाकी असताना आपण या स्पर्धेत खेळणार नसल्याचे हिंदुस्थानी संघाने स्पष्ट केले आहे. हिंदुस्थान जर या स्पर्धेसाठी जाणार नसेल तर बाकीचे देशही या स्पर्धेसाठी जाणार नसल्याचे समोर येत आहे. आशिया खंडात हिंदुस्थानची काय ताकद आहे, हे पाकिस्तानला दाखवून देण्यात सध्या कुठलीस कसर सोडली जात नाहीये. त्यामुळे आता पाकिस्तानचे धाबे चांगलेच दणाणले असेल.
Comments are closed.