दंडकारण्यात नक्षलवाद्यांच्या विरोधातील फास अधिक घट्ट; अनेक आव्हानांची पराकाष्ठा करत सुरक्षा दला
छत्तीसगडमध्ये अँटी नॅक्सल ऑपरेशन: देशाच्या एका बाजूला दहशतवाद (Naxal) विरोधातला सर्वात मोठं ऑपरेशन सध्या सुरू आहे. तर दुसऱ्या बाजूला छत्तीसगडच्या (Chhattisgarh) दंडकारण्यातील छत्तीसगड – तेलंगणाच्या सीमेवर नक्षलवाद विरोधातलं आजवरचं देशातलं सर्वात मोठं ऑपरेशन (Naxal Encounter) राबवलं जात आहे. करेगुट्टाच्या डोंगराळ भागात सीआरपीएफ, छत्तीसगड पोलीसांचे STF आणि DRG तसेच तेलंगाना पोलिसांच्या ग्रे हाऊंड्स तुकड्यांतील एकूण 7 हजार पेक्षा जास्त जवानांनी 500 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांना (Naxalites) गेल्या आठवड्याभरापासून घेरून ठेवले आहे. दरम्यान, छत्तीसगडमधील करेगुट्टा डोंगराच्या अवतीभवती सुरक्षा दल हळुहळू त्यांचा फास घट्ट करत आहे.
डोंगराच्या अवतीभवतीच्या अनेक किलोमीटरच्या वन क्षेत्रातून हळू हळू सुरक्षा दल एक एक पाऊल समोर जात आहे. मात्र, नक्षलवाद्यांनी जमिनीत पेरलेले भू-सुरंग आणि स्फोटके सुरक्षा दलांसमोर मोठ्या अडचणी निर्माण करत आहे. जवानांना नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी पेरून ठेवलेल्या भूसुरुंग पासून स्वत:ला वाचवत एक एक पाऊल टाकावा लागत आहे. नक्षलवाद्यांनी जंगलात चालण्यासाठी नैसर्गिकरित्या तयार झालेल्या पायवाटवर अनेक ठिकाणी स्फोटके पेरून ठेवल्याचे आता उघड होत आहे.
नक्षलवाद्यांनी ठिकठिकाणी जमिनीत पेरले भू-सुरंग अन् स्फोटके
समोरुन येणाऱ्या सुरक्षा दलातील जवानांना जास्तीत जास्त नुकसान व्हावा, म्हणून बिअरच्या बॉटलमध्ये स्फोटक भरून जवानांना जखमी करण्याचे नियोजन नक्षलींनी केल्याचे दिसून येत आहे. अशातच काल (28 एप्रिल) करेगुट्टा डोंगराच्या आजूबाजूच्या अनेक किलोमीटरच्या परिसरात अनेक ठिकाणी सुरक्षा दलातील जवानांना अशाच पद्धतीने काचेच्या बॉटलमध्ये स्फोटके भरून ते जमिनीत पुरल्याचे आणि त्याला वायरद्वारे जोडून स्फोटकांचे सापळे तयार केल्याचे दिसून आले. त्यामुळे सुरक्षा दलातील जवान डोंगरावर मोक्याच्या ठिकाणी शस्त्रांसह बसलेले नक्षलवादी आणि जमिनीत पायाखाली स्फोटके अशा दुहेरी आव्हानांचा सामना करत समोर जात आहेत.
500 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांसह मोठ्या कमांडर्सला घेरलं
करेगुट्टाच्या डोंगराच्या या ऑपरेशनमध्ये सुरक्षा दलांना अद्याप फारसं यश मिळालं नसलं, तरी या ठिकाणी सुरक्षा दलाने 500 पेक्षा जास्त नक्षलवाद्यांसह त्यांच्या सर्व मोठ्या कमांडर्सला घेरले आहे. या घेराबंदीचा काय महत्व आहे हे ओळखूनच सुरक्षा दल गेले पाच दिवस 44 – 45 अंश सेल्सिअस तापमानामध्ये सातत्याने धैर्य ठेवून करेगुट्टाच्या डोंगराला घेरा घालून थांबले आहे. अधून-मधून गोळीबार सुरू आहे. जर या ऑपरेशनच्या माध्यमातून सुरक्षा दल हिडमा आणि देवाला नामोहरम करण्यात किंवा अटक करण्यात यशस्वी ठरले, तर फक्त छत्तीसगडच नाही तर भारतातील नक्षलवादावर सुरक्षा दलांचे हे आजवरचा सर्वात मोठा आघात मानला जाईल.
हे ही वाचा
अधिक पाहा..
Comments are closed.