पहलगाम हल्ल्यातील पीडित सहा कुटुंबांना प्रत्येकी 50 लाख रुपयांची मदत, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची घोषणा

पहलगाममध्ये पर्यटकांवर दहशतवादी हल्ला झाला होता. त्यात महाराष्ट्रातील काही पर्यटकांचा मृत्यू झाला होता. मृतांच्या नातेवाईकांना नुकसानभरपाई म्हणून 50 लाख रुपये दिले जातील अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. तसेच मृतांच्या नातेवाईकांना शिक्षण आणि नोकरीतही सरकार मदत करणार असल्याचे मुख्यमंत्री फडणवीस यांनी जाहीर केले. तसेच मृतांच्या कुटुंबातील एका व्यक्तीला सरकारी नोकरी दिली जाईल असेही फडणवीस यांनी यावेळी सांगितले.
Comments are closed.