फ्रेंडशीप तुटली, वाढदिवसाला दिलेलं गिफ्ट परत घ्यायला मुलीच्या घरी गेला, मैत्रिणीसह अख्ख्या बिल्
<पी शैली ="मजकूर-संरेखित: न्याय्य;">भिवंडी: भिवंडीत चोरी केल्याच्या संशयातून दोन 16 वर्षीय अल्पवयीनांना जमावाने बेदम मारहाण केल्याची संतापजनक घटना शास्त्रीनगरमध्ये घडली आहे. याप्रकरणी जमावाच्या विरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. रमजान आकिब कुरेशी, आबिद कुरेशी, दानिश कुरेशी, पापा कुरेशी, नेहा कुरेशी,आशिया कुरेशी, रेश्मा कुरेशी, गुमची कुरेशी, नदीम, इम्तियाज, अफान व त्यांचे इतर चार साथीदार अशी गुन्हा दाखल झालेल्या जमावाची नावे आहेत. तर दानिश सिकंदर मोमीन (16) व त्याचा मित्र जुनैद नुरुलहसन सिध्दीकी (१६) अशी जखमींची नावे आहेत.
जखमी दानिश मोमीन यांनी सांगितले की, मैत्रिणीच्या वाढदिवसाला घड्याळ गिफ्ट केला होता. परंतु काही दिवसांनी त्यांचा बोलणं चालणं बंद झाल्याने त्यांनी घड्याळ परत मागितली होती व ती देण्यासाठी मैत्रिणीने त्याला मेसेज करून बोलावला होता. त्यामुळे दानिश व त्याचा मित्र मैत्रिणीच्या घराकडे गेले असता त्यांना तिथे चोरीचा संशयावरून जबर मारहाण करण्यात आली. एवढेच नव्हे तर दानिशला नग्न करून बेदम मारहाण करण्यात आली. पोलिसांचा हस्तक्षेपामुळे दानिशला जमावाच्या मारहाणीतून सुरक्षित काढून उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नगमा सिकंदर मोमीन (37) ही महिला मंगल बाजारातील जैतुनपुरा परिसरात राहत असून तिचा मुलगा दानिश आणि त्याचा मित्र जुनैद हे दोघे 26 एप्रिल रोजी सकाळी 11 वाजता शास्त्रीनगर मधील पाचू कंपाऊंड मधील बुशरा अपार्टमेंट येथे गेले असता वरील जमावाने संगनमताने दोघांनाही चोरीच्या संशयावरून हाताच्या ठोश्या बुक्क्यांसह काठीने बेदम मारहाण करून गंभीर जखमी केले आहे. याप्रकरणी अल्पवयीन मुलाच्या आईने दिलेल्या तक्रारीवरून सर्वांच्या विरोधात शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला असून या घटनेचा पुढील तपास भिवंडी शहर पोलीस करीत आहेत.
Comments are closed.