सोने दरानं 1 लाखांचा टप्पा ओलांडल्यानंतर दरवाढीला ब्रेक, सोन्याची भाववाढ थांबवणारी कारणं कोणती?

<एक शीर्षक ="नवी दिल्ली" href ="https://marathi.tezzbuzz.com/topic/new-delhi" डेटा-प्रकार ="इंटरलिंकिंगकेवर्ड्स">नवी दिल्ली : आंतरराष्ट्रीय पातळीवर आणि भारतीय बाजारापेठांमध्ये सोन्याच्या दरात मोठी वाढ झाल्याचं पाहायला मिळालं आहे. 22 एप्रिलला सोन्याच्या दरानं 1 लाख रुपयांचा टप्पा पार केला होता. तज्ज्ञांनी यापूर्वी वर्तवलेल्या अंदाजाप्रमाणं सोन्याचे दर 1 लाख रुपयांचा टप्पा अक्षय तृतीयेला पार करतील अशी आशा होती. मात्र, 22 एप्रिललाच  सोन्याच्या दरानं 1 लाख रुपयांचा टप्पा पार केला होता. मात्र, त्यानंतर सोन्याच्या दरात घसरण झाल्याचं पाहायला मिळतंय. इंडियन बुलियन असोसिएशन यांनी दिलेल्या माहितीनुसार आज (29 एप्रिलला) सोन्याच्या दरात 0.8 टक्के घसरण झाली. सोन्याचे दर  प्रति 10 ग्रॅम 95560 रुपयांवर पोहोचले आहेत. 

आंतरराष्ट्रीय पातळीवर सोन्याच्या दरात 1 टक्के घसरण झाली आहे. स्पॉट गोल्डचा दर 0.8 टक्के घसरुन 3314.99 डॉलर प्रति औंसवर पोहोचला आहे. तर, यूएस गोल्ड फ्यूचर्सचा दर 0.7 टक्के घसरुन 3325 डॉलर प्रति औंसवर आला आहे.   

जागतिक पातळीवर सोन्याचे दर घसरले

आंतरराष्ट्रीय व्यापारातील कमी झालेला तणाव आणि जागतिक बाजारातील गुंतवणूकदारांची सकारात्मकता यामुळं सोन्याच्या दरात घसरण झाली आहे. अमेरिकेला भारतासह इतर देशांनी व्यापारी करारांसदर्भात सकारात्मक प्रस्ताव दिलेले आहेत, असं अमेरिकेच्या स्कॉट पेसेंट यांनी म्हटलं होतं. अमेरिका लवकरच भारतासोबत व्यापारी करार करु शकते. डोनाल्ड ट्रम्प यांनी टॅरिफ आकारणीच्या निर्णयाला 90 दिवसांची स्थगिती दिली होती. याशिवाय काही अमेरिकन वस्तूंवरील टॅरिफ हटवण्याचा चीनचा निर्णय देखील सकारात्मक मानला जात आहे. अमेरिका आणि चीनमधील तणाव कमी होण्याचे संकेत असल्याचं मानलं जातंय. अमेरिकेकडून देखील ऑटो टॅरिफ कमी करण्यासंदर्भातील संकेत दिले आहेत.ऑटो टॅरिफ कमी केल्यानंतर व्यापारी संबंध होतील, अशी आशा जाणकारांना आहे. 

एलकेपी सिक्युरिटीजचे व्हाइस प्रेसिडेंट रिसर्च अनालिस्ट जीतन त्रिवेदी यांनी या संदर्भात बोलताना म्हटलं की व्यापारी संबंधातील तणाव कमी झाल्यानं आणि अमेरिकेनं टॅरिफ संदर्भात विविध देशांशी चर्चेचा मार्ग स्वीकारला आहे. याशिवाय चीन आणि अमेरिका यांच्यात लवकरच व्यापारी करार होण्यासंदर्भातील डोनाल्ड ट्रम्प यांच्या वक्तव्यामुळं आंतरराष्ट्रीय बाजारातील तणाव कमी होण्यास मदत मिळाली आहे. याशिवाय रशिया आणि यूक्रेन यांच्यात देखील शांतता करार होण्याची शक्यता असल्यानं सुरक्षित गुंतवणुकीची भावना कमी झाली आहे. 

जेव्हा गुंतवणूकदारंची भीती कमी होईल आणि सुरक्षित गुंतवणूक पर्याय म्हणून लोक सोन्यातील गुंतवणूक थांबवतील तेव्हा  सोन्याची मागणी कमी होईल. जेव्हा सोन्याची मागणी कमी होईल तेव्हा त्याचे दर घटतील. तज्ज्ञांच्या माहितीनुसा जागतिक बाजारातील मंदीची भीती आणि आंतरराष्ट्रीय बाजारातील अनिश्चिततेच्या कारणानं सोन्याचे दर 3500.05 डॉलर प्रति औंस इथपर्यंत पोहोचले होते. 

Comments are closed.