वैभव सूर्यवंशीच्या बालपणीच्या प्रशिक्षकांची प्रतिक्रिया, 14 वर्षांच्या या फलंदाजाबाबत केला मोठा दावा
सोमवारी झालेल्या सामन्यानंतर प्रत्येक ठिकाणी 14 वर्षांच्या वैभव सूर्यवंशीची चर्चा सुरू आहे. प्रत्येक जण या युवा खेळाडू बद्दल कौतुक करत आहे. तत्पूर्वी वैभवचे लहानपणीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी एक मोठा दावा केला आहे, जाणून घ्या ते काय म्हणाले?
वैभव सूर्यवंशीचे लहानपणीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांना आशा आहे की, त्यांचा 14 वर्षांचा वैभव येत्या एक-दोन वर्षांमध्ये भारताच्या टी-20 संघात स्थान निर्माण करेल. वैभवने सोमवारी गुजरात टायटन्स विरुद्ध फक्त 38 चेंडूत 101 धावा करून 14 वर्ष आणि 32 दिवसांच्या लहान वयामध्ये आयपीएलमधील सर्वात कमी वयाचा शतकवीर बनण्याचा विक्रम मोडला आहे.
वैभव सूर्यवंशीचे लहानपणीचे प्रशिक्षक मनीष ओझा यांनी पीटीआयशी बोलताना म्हटले, एक प्रशिक्षक म्हणून माझ्यासाठी ही खूप अभिमानाची गोष्ट आहे. बिहार सारख्या राज्यासाठी, जे राज्य खेळासाठी मजबूत नाही हे सूर्याच्या किरणासारखे आहे. त्याने खूप लोकांना प्रेरित केले असेल. त्याने बिहारला भारतात सन्मान मिळवून दिला आहे. मला पूर्ण विश्वास आहे की, जर तो या प्रकारे खेळत राहिला तर निश्चित स्वरूपात येणाऱ्या एक दोन वर्षांमध्ये भारताच्या टी20 संघात तो नक्कीच स्थान निर्माण करेल.
वैभव सूर्यवंशी आधी भारतासाठी अंडर 19 खेळलेला आहे. त्याने जानेवारी 2024 मध्ये प्रथम श्रेणीमध्ये पदार्पण केलं होतं. ओझा म्हणाले, तो नैसर्गिक प्रतिभेचा धनी आहे आणि कोणतीही गोष्ट लवकर शिकतो. त्याला लांब शॉट खेळायला आवडतात. दोन वर्षा आधी अकॅडमीमध्ये सरावादरम्यान मी त्याला विचारले होते की, तू एक किंवा दोन धावा का करत नाहीस? तेव्हा तो मला म्हणाला, जर मी षटकार ठोकू शकतो तर मला एक दोन धावा करण्याची गरज नाही.
वैभवच्या दमदार खेळीमुळे सोमवार रोजी राजस्थान रॉयल्सने 15.5 षटकात 210 धावांचं आव्हान पूर्ण केलं. वैभवने 35 चेंडूत शतक झळकावले. आता तो आयपीएल मध्ये सर्वात वेगाने शतक झळकावणारा दुसरा भारतीय खेळाडू ठरला आहे.
Comments are closed.