वजन कमी करण्याच्या टिप्स: वजन lesasathi सर्वोत्तम स्मार्ट
वाढत्या वजनामुळे अनेक समस्या निर्माण होतात. यामुळे तुमच्या शरीराचा केवळ आकारच बिघडत नाही तर आरोग्याशी संबंधित इतर अनेक समस्याही उद्भवतात. जास्त लठ्ठपणामुळे थायरॉईड, मधुमेह, उच्च रक्तदाब, नैराश्य इत्यादी समस्या देखील उद्भवतात. अशा परिस्थितीत, तुम्हाला तुमच्या खाण्याच्या सवयींमध्ये काही बदल करणे गरजेचे आहे. व्यायाम, वर्कआऊट्स हे सगळं करण्याबरोबरच आपल्या आहाराकडेही तितकेच लक्ष देणे महत्त्वाचे आहे. यासाठीच जाणून घेऊयात काही बेस्ट स्मूदी रेसिपीज. या स्मूदीजने तुम्ही तुमच्या दिवसाची सुरूवात करू शकता.
आंबा केळी दालचिनी स्मूदी
ही स्मूदी बनवण्यासाठी प्रथम ब्लेंडरमध्ये सोया मिल्क घ्या. आता त्यात केळी घाला. केळी पूर्णपणे एकत्र केल्यानंतर त्यात शेंगदाण्याचा कूट घाला. याशिवाय, चवीनुसार कोकोनट शुगर घाला. ते पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर त्यात आंब्याचे तुकडे घाला. आता त्यात 3 ते 4 बर्फाचे तुकडे घाला, यामुळे चव सुधारते. केळी आंबा स्मूदी तयार केल्यानंतर, ते एका भांड्यात काढा आणि त्यावर दालचिनी पावडर स्प्रे करा. याशिवाय तुमच्या आवडीनुसार तुम्ही आंब्याचे तुकडे त्यावर टाकू शकता.
स्ट्रॉबेरी केळी स्मूदी
हे करण्यासाठी, प्रथम चिया सीड्स भिजवा. नंतर स्ट्रॉबेरी आणि केळे मिसळा. आता त्यात बदाम मिल्क घाला. ते पूर्णपणे एकजीव झाल्यानंतर त्यात अंजीर आणि स्ट्रॉबेरी एसेन्स घाला. यानंतर त्यात बर्फाचे तुकडे घाला. स्मूदी पूर्णपणे तयार झाल्यानंतर, भिजवलेल्या चिया सीड्स ग्लासमध्ये घाला आणि तयार स्मूदी त्यात ओता.
सफरचंद स्मूदी
वजन कमी करण्यासाठी तुम्ही सफरचंदापासून स्मूदी देखील बनवू शकता. यासाठी सफरचंदाचे तुकडे, काजू बटर, चिया बियाणे आणि सोया दूध वापरले जाते. ही स्मूदी तुमचे वजन सहज कमी करण्यास मदत करेल. सफरचंद स्मूदी तयार करण्यासाठी केवळ 5 मिनिटे लागतील. सफरचंद कापून त्याची पेस्ट तयार करा. ही पेस्ट एका ग्लास दुधात मिसळा. आता या मिश्रणात चिया सीड्स आणि दालचिनी पावडर घाला. त्यात तुम्ही तुमच्या आवडीनुसार, ड्रायफ्रूट्स आणि सफरचंदाचे तुकडे घालू शकता.
हेही वाचा : Gardening Tips : घरीच तयार करा वर्मी कम्पोस्ट
संपादित – तनवी गुडे
Comments are closed.