Rohit Pawar’s statement predicting that the Mahayuti will break up in the 2029 assembly elections is being discussed


उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू तर, शरद पवार आणि अजित पवार हे पवार कुटुंबातील काका-पुतण्या एकत्र येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीबाबत सूचक वक्तव्य केले आहे.

पुणे : महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या विस्कटलेली घडी पुन्हा बसणार असं चित्र पाहायला मिळत आहे. कारण मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी काही दिवसांपूर्वीच युतीसाठी दिलेल्या टाळीला शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी प्रतिटाळी दिली आहे. तर मागील महिन्यात शरद पवार आणि अजित पवार हे विविध बैठकांच्या निमित्ताने एकत्र आल्याचे दिसून आले आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे हे दोन्ही ठाकरे बंधू तर, शरद पवार आणि अजित पवार हे पवार कुटुंबातील काका-पुतण्या एकत्र येणार का? याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. अशातच राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार रोहित पवार यांनी महायुतीबाबत सूचक वक्तव्य केले आहे. (Rohit Pawar’s statement predicting that the Mahayuti will break up in the 2029 assembly elections is being discussed)

डिसेंबर 2024 मध्ये पार पडलेल्या विधानसभा निवडणुकीत सर्वाधिक 132 जागा जिंकल्यानंतर भाजपाने संघटन पर्वच्या माध्यमातून पक्षबळकटी करण्याचे काम सुरू आहे. तर दुसरीकडे 2029 च्या निवडणुकीत एकहाती सत्ता खेचण्याचा भाजपचा प्रयत्न असल्याचे यापूर्वीच त्यांच्या नेत्यांनी बोलून दाखवले आहे. अशातच पुण्यातील खेड राजगुरुनगर पत्रकारांशी संवाद साधताना रोहित पवार यांनी महायुतीबाबत महत्त्वाचे भाकीत केले आहे.

हेही वाचा – Maharashtra Cabinet : पीकविमा योजनेत होणार बदल; मंत्रिमंडळ बैठकीत 11 महत्त्वाचे निर्णय

रोहित पवार म्हणाले की, राज्यातील महायुती सरकार 2029 च्या लोकसभेपर्यंत टिकेल आणि विधानसभा निवडणुकांवेळी महायुती तुटेल, असा दावा रोहित पवार यांनी केला आहे. तसेच उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे आधी एकत्र तर येऊ द्या, मग काय करायचं ते ठरवू, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले आहे. त्यामुळे शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमकं काय सुरू आहे. याची चर्चा सध्या राजकीय वर्तुळात होताना दिसत आहे.

पुणे जिल्ह्यातून रोज 20 महिला बेपत्ता

राज्यातील ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेवर बोलताना रोहित पवार म्हणाले की, एकट्या पुण्यात वर्षभरात 650 बलात्काराच्या आणि 850 विनयभंगाच्या घटना घडल्या आहेत. पुणे जिल्ह्यातून रोज 20 महिला बेपत्ता होत आहेत. त्यामुळे महिला किती असुरक्षित आहेत ही गोष्ट यातून अधोरेखित होते. मात्र याप्रकरणी ठोस काहीच कारवाई होताना दिसत नाही. उलट राजकीय नेते गुन्हेगारांना सोबत बाळगून चुकीची प्रवृत्ती निर्माण करत आहेत. हे पाहता महाराष्ट्राचा यूपी-बिहार झालाय, असं म्हणण्यास हरकत नाही, असे म्हणत रोहित पवार यांनी महायुती सरकारबद्दल संताप व्यक्त केला.

हेही वाचा – Crime : नऊ महिने गर्भात सांभाळले अन् प्रसुतीनंतर बाळाची हत्या केली; धक्कादायक कारण आलं समोर 



Source link

Comments are closed.