पाकिस्तानी उड्डाणे बंद करण्यासाठी भारतीय हवाई क्षेत्र

सागरी जहाजांनाही रोखण्याची तयारी

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

पहलगाम हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानच्या विरोधात अनेक निर्णय घेतले आहेत. तर दुसरीकडे पाकिस्ताननेही भारतीय विमानांसाठी स्वत:चे हवाईक्षेत्र बंद केले आहे. याचदरम्यान भारत सरकार पाकिस्तानी एअरलाइन्ससाठी स्वत:चे हवाईक्षेत्र बंद करण्याचा विचार चालविला आहे.

पाकिस्तानी एअरलाइन्सला भारतीय हवाईक्षेत्रात प्रवेशाची अनुमती न देण्याचा विचार भारत सरकार करत आहे. या निर्णयानंतर पाकिस्तानी एअरलाइन्सला दक्षिणपूर्व आशियाई देशांपर्यंत पोहोचण्यासाठी चीन आणि श्रीलंकेच्या मार्गे जावे लागणार आहे. याचबरोबर भारतीय बंदरांवर पाकिस्तानी जहाजांना थांबू न देण्याचा विचारही केला जात आहे. पर पाकिस्तानी एअरलाइन्स भारताकडून कुठल्याही प्रकारच्या कारवाईच्या भीतीने यापूर्वीच भारतीय हवाईक्षेत्रात प्रवेश करणे टाळत आहेत.

Comments are closed.