DC vs KKR: 'हा' ठरला कोलकात्याचा विजयाचा टर्निंग पाँईंट

आयपीएल 2025च्या 48व्या सामन्यात केकेआरने दिल्ली कॅपिटल्सला त्यांच्याच घरच्या मैदनावर मात दिली. केकेआरने हा सामना 14 धावांनी जिंकला. या सामन्यात सुनील नारायणने अप्रतिम कामगिरी केली. दिल्लीच्या पारड्यात झुकलेला सामना त्याने स्वबळावर केकेआरला जिंकवून दिला. या सामन्यात नारायणची अष्टपैलू कामगिरी पाहायला मिळाली.

पहिल्या डावात खेळताना केकेआरने मर्यादित 20 षटकात 9 विकेट्स गमावून 204 धावा केल्या, ज्यात अंगकृष रघुवंशीने सर्वाधिक 44 धावा केल्या. 205 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना दिल्लीने पहिल्याच षटकात अभिषेक पोरेलच्या रुपाने पहिली विकेट गमावली. यानंतर दिल्लीच्या 60 धावांवर 3 विकेट पडल्या तेव्हा केकेआर सामना सहज जिंकेल असे वाटत होते, पण फाफ आणि अक्षर यांनी प्रतिआक्रमण केले. दोघांनीही वेगाने धावा काढायला सुरुवात केली. दोघांमध्ये 76 धावांची भागीदारी झाली. 13.1 षटकांत दिल्लीचा स्कोअर 3 विकेटवर 136 धावांवर होता. येथून सामना दिल्लीच्या हातात होता. पण त्यानंतर सुनील नारायणने अक्षर पटेलला बाद केले.

त्यानंतर सुनील नारायणने ट्रस्टन स्टब्सला बाद केले. शिवाय नारायणने फाफ डू प्लेसिसलाही बाद केले. त्याने 45 चेंडूत 62 धावा काढल्या. अक्षर आणि फाफ बाद होताच केकेआरने सामन्यात वर्चस्व गाजवले.

शेवटी, आशुतोष शर्मा आणि विप्राज निगमकडून चमत्कार अपेक्षित होता, परंतु आशुतोष षटकार मारल्यानंतर बाद झाला. त्याने सात धावा काढल्या. विप्राजने आक्रमक वृत्ती दाखवली. त्याने 19 चेंडूत 4 चौकार आणि 3 षटकारांसह 43 धावांची खेळी खेळली, परंतु तो दिल्लीला विजय मिळवून देऊ शकला नाही.

Comments are closed.