सांभाळा… उष्मा करतोय घात ! राज्यात तीन संशयित रुग्णांचा मृत्यू

येताहेत, प्रचंड उकाडा असूनही घाम येत नाही… तर मग सावधान ! तुम्हाला उष्माघात असू शकतो. त्यामुळे वेळीच वैद्यकीय सल्ला घ्या, असा सल्ला तज्ज्ञांकडून देण्यात येत आहे. राज्यात उष्माघाताच्या तीन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला असून, 70 जणांना या व्याधीने घेरले आहे. पुणे जिल्ह्यात एका रुग्णाची नोंद झाली आहे.

राज्यभरात 1 मार्च ते 23 एप्रिल या कालावधीत 70 उष्माघाताचे रुग्ण आढळून आले आहेत, तर तीन संशयित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. मृत्यू झालेले तिघे रुग्ण नागपूर जिल्ह्यातील आहेत. आरोग्य विभागाच्या अहवालानुसार राज्यात सर्वाधिक उष्मघाताच्या रुग्णांची नोंद यवतमाळ जिल्ह्यात झाली आहे. या जिल्ह्यात 11 रुग्णांची नोंद झाली आहे. त्या पाठोपाठ चंद्रपूर जिल्ह्यात 9, नागपूर जिल्ह्यात 8, गडचिरोली, जालना, परभणी या जिल्ह्यात प्रत्येकी 5 रुग्णांची नोंद झाली आहे. तसेच धुळे जिल्ह्यात 4, पालघर जिल्ह्यात 3, कोल्हापूर, लातूर, नांदेड, नाशिक, रायगड, वर्धा जिल्ह्यात प्रत्येकी 2 रुग्ण आढळून आले आहेत. पुणे, अमरावती, छत्रपती संभाजीनगर, चंद्रपूर, घाराशिव, सांगली, ठाणे, वाशिम जिल्ह्यात प्रत्येकी एक उष्माघाताचा रुग्ण आढळून आला आहे.

दगावलेले रुग्ण नागपूर जिल्ह्यातील वाढत्या उष्णतेमुळे उष्माघाताच्या रुग्णांची नोंद होत असतानाच उष्माघाताच्या तीन संशयित रुग्णांचा मृत्यू झाल्याचे आरोग्य विभागाच्या अहवालात नमूद करण्यात आले असून हे तिन्ही रुग्ण नागपूर जिल्ह्यातील असल्याचेही अहवालात म्हटले आहे.

उष्माघाताची लक्षणे
शरीराचे तापमान 104° F किंवा
त्याहून अधिक असणे.
अस्पष्ट बोलणे, चिडचिड होणे, फेफरे येणे.
श्वासोच्छवास आणि हृदयाची गती वाढणे, मळमळ आणि उलट्या होणे.
गरमी-उकाड्यातही घाम न येणे, चक्कर येणे

या करा उपाययोजना
उन्हात फिरणे टाळून सावलीत,
वातानुकूलित यंत्रणा असलेल्या ठिकाणी बसावे,
वारंवार पाणी पित राहावे.
सैल आणि हलके कपडे परिधान करावेत.
गरम पदार्थ खाणे किंवा पिणे टाळावे.
भरपूर प्रमाणात पाणी प्यावे.

Comments are closed.