अंगाला हळद लागली, मांडव सजला; लग्न लागणार तोच बाल संरक्षण पथकाची गाडी धडकली अन्…; नागपुरात खळबळ
अक्षय तृतीयाच्या पूर्वसंध्येला दोन बाल विवाह थांबवण्यात बाल संरक्षण पथकाला यश आले आहे. काटोल तालुक्यातील डोंगरगाव, तसेच कनान पोलीस स्टेशन हद्दीच्या अंतर्गत ही घटना घडली असून यातील एक मुलगी पंधरा वर्षाची आहे. तर दुसरी 17 वर्षाची असल्याची माहिती समोर आली आहे.

काटोल तालुक्यातील डोंगरगाव तसेच कनान पोलीस स्टेशन हद्दीतील अंतर्गत बालविवाह होणार असल्याची माहिती बाल संरक्षण पथकाला मिळाली. त्यानुसार तातडीने कारवाई करून बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नुसार बालविवाह थांबण्याची कारवाई करण्यात आली आहे.

अक्षय तृतीया या पावन सणांमध्ये अनेक अल्पवयीन मुलीचे लग्न लावून दिल्या जातात व काही समाजामध्ये अल्पवयीन मुलीचे लग्न लावण्याची प्रथा आहेत. या बाबतीत अल्पवयीन बालिकेचे बालविवाह होऊ नये याबाबत राष्ट्रीय बाल अधिकार संरक्षण आयोग तसेच महिला व बालविकास आयुक्तालय पुणे, आयुक्त श्रीमती नयना गुंडे यांचे बालविवाह होऊ नये याबाबतचे स्पष्ट निर्देश होते. त्यानुसार जिल्हाधिकारी विपीन ईटणकर व मुख्य कार्यकारी अधिकारी विनायक महामुनी यांनी सर्व जिल्ह्यातील अधिकाऱ्यांची बैठक घेऊन बालविवाह होणार नाही याबाबतचे परिपत्रक जारी केले.

अशातच अक्षय तृतीयेच्या पूर्वसंध्येला बालविवाह होत आहे, अशी माहिती बाल संरक्षण पथकातील अधिकारी यांना मिळाली. त्यानुसार काटोल तालुक्यातील डोंगरगाव येथील 15 वर्षीय मुलीचे बालविवाह होणार होते मुलीला हळद लागून मुलगी मंडपात येण्याच्या तयारीमध्ये होती. मंडप सजलेला होता, पाहुण्यांचे आगमन झाले होते व स्वयंपाकपण पूर्ण झालेला होता. त्यातच बालसंरक्षण पथकाचे अधिकारी कर्मचारी मंडपात धडकले व मुली बाबत माहिती विचारू लागले.

मुलीचे व मुलाच्या नातेवाईकांनी गोंधळ घालायला सुरुवात केली. परंतु बालविवाह अधिनियम 2006 नुसार मुलीचे वय 18 वर्षे तसेच मुलाचे वय 21 वर्षे पूर्ण होत नाही, तेव्हापर्यंत विवाह करण्यात बालविवाह प्रतिबंधक कायद्यानुसार बंद आहे. मुलीचे कागदपत्र तपासले असता मुलगी 15 वर्षाची होती, असे दिसून आले.

त्यामुळे तातडीने बाल संरक्षण पथकाने बंद पत्र तयार करून उपस्थित सर्व लोकांचे सह्या घेऊन अल्पवयीन मुलीला तातडीने ताब्यात घेण्याचे पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलिसांनी मुलीला ताब्यात घेऊन मुलींचे बालगृह येथे दाखल केले.

तर दुसऱ्या प्रकरणांमध्ये मुलगी 17 वर्षाची असताना तिथे पण मुलीला हळद लागलेली होती. सदर कारवाईबाबत बाल संरक्षण पथकाकडून आई-वडिलांना माहिती देण्यात आली व त्यानुसार बालविवाह प्रतिबंध अधिनियम 2006 नवे प्रतिबंधात्मक कारवाई करण्याकरिता पोलिसांना व इतर अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या.

दोन्ही कारवाई अक्षर तृतीयेच्या पूर्वसंध्येला करण्यात आलेली आहे. सदर कार्यवाही जिल्हा महिला बालविकास अधिकारी रणजीत कुरे यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हा बाल संरक्षण अधिकारी मुस्ताक पठाण यांच्या पथकाने केली.
येथे प्रकाशित: 30 एप्रिल 2025 09:00 एएम (आयएसटी)
क्राईम फोटो गॅलरी
अधिक पाहा..
Comments are closed.