केआर वि डीसी ईपीएल 2025: कोकाटा संघाचा नारायण नारायण
केकेआर वि डीसी आयपीएल 2025: नुसते नावात नारायण असून चालत नाही…नारायणासारखी स्थितप्रज्ञता सुद्धा असावी लागते…अत्युच्च शिखरावर किती शांत राहतो हा माणूस. मॅनेजमेंट गुरूंनी सुनील नारायण वर चार-पाच स्लाईड बनवायला काही हरकत नाही…एका बाजूला एक बळी मिळविला की गोलंदाज काय पद्धतीने जल्लोष करतात…एखादे अर्धशतक झाले की फलंदाज किती जल्लोष करतात…पण हा माणूस गेली कित्येक वर्ष आय पी एल स्पर्धेत खेळतो..आपल्या गोलंदाजीने भल्या भल्या फलंदाजाना भांबावून सोडतो…आपल्या फलंदाजीने मोठ मोठ्या गोलंदाजना चक्रावून सोडतो..पण तरी सुद्धा हा शांत…या माणसाच्या चेहऱ्यावर एखादे स्मित हास्य पाहणे म्हणजे कपिला षष्ठीचा योग…गेल्या वर्षीच्या आय पी एल स्पर्धेत हा MVP पुरस्काराचा मानकरी..पण इतका दमदार परफॉर्मन्स असून कधी अहम पणा नाही…की कधी आत ताई पणा नाही..कसे जमू शकते या माणसाला. .अर्ध्या हळकुंडाने पिवळे होणारे आम्ही सुनील नारायण या माणसाकडून खूप काही शिकू शकतो…
कालच्या सामन्यात अगदी मोक्याच्या क्षणी आपली कामगिरी उंचावली…संघाला जेव्हा विकेट हव्या होत्या तेव्हा सुनील नारायण याने विकेट मिळवून दिल्या ..त्या सुद्धा कोणाच्या डुप्लेसी..अक्षर…आणि स्टब…अजिंक्य रहाणे जखमी झाल्यावर कर्णधारपद सांभाळले…४ षटकात केवळ २९ धावा ३ बळी आणि एका अचूक फेकीवर राहुल याला धावचीत केले… लीड फ्रॉम दि फ्रंट यालाच तर म्हणतात…दिल्ली संघाला त्याने सांघिक १४ व्या व आपल्या तिसऱ्या षटकात बॅकफूट वर नेले ..त्याच षटकात त्याने अक्षर आणि स्टब यांना बाद करून कोलकाता संघाचे पारडे जड केले..दिल्ली संघाकडून अक्षर आणि डुप्लेसी यांनी प्रयत्न केले..४२ चेंडूत ७६ धावांची भागीदारी केली..पण ते बाद झाल्यावर राजधानी चे बाकीचे डबे रुळावरून घसरले …त्यांच्या या घसरणीत वरूण ने सुद्धा वाटा उचलला…
नाणेफेक जिंकून दिल्ली संघाने प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारून कोलकाता संघाला प्रथम फलंदाजी केली..आज कोलकाता संघाने २०९ धावा जरी धावफलकावर लावल्या तरी त्यांच्या एका सुद्धा फलंदाजाने अर्धशतक झळकावले नाही हे विशेष..पहिल्या विकेट साठी ४८ धावा जोडून पहिल्या ६ षटकात त्यांनी ७९ धावा केल्या…कोलकाता संघाच्या प्रत्येक फलंदाजाने छोट्या छोट्या भागीदारी केल्या..आणि आज मधल्या षटकात रघुवंशी आणि रिंकू यांनी ४६ चेंडूत ६१ धावा करून धावसंख्येला आकार दिला…रघुवंशी याने विपराज याला जे सलग दोन षटकार खेचले त्यावरून अभिषेक नायर त्याला इतके हाय रेट का करतात हे समजून येते..आज आल्या आल्या अजिंक्य ने स्टार्क ला एक सुंदर पिक अप चा षटकार खेचला आणि दुसऱ्या चेंडूवर एक खणखणीत ऑन ड्राइव्ह मारला…ते दोन्ही फटके पाहून दिल्ली संघाचे प्रशिक्षक पीटरसन सुद्धा खुश झाले…इतके डोळ्यांना आनंद देणारे ते फटके होते…वेगात निघालेली राजधानी स्पर्धा अंतिम टप्प्यात आली असताना मंदावली आहे….त्यांचे पुढील सामने हैदराबाद..पंजाब..गुजरात..आणि मुंबई संघासोबत आहेत…राहुल नाम तो सुना होगा असे म्हणणारा शाहरुख सिनेमात शेवटी शेवटी नायिकेचे प्रेम मिळवितोच…दिल्ली संघाच्या राहुल आणि अक्षर यांना घसरलेली राजधानी पुन्हा रुळावर आणून आय पी एल नामक नायिकेला गवसणी घालायची आहे.. कारण सलग दोन सामने हरल्यावर त्यांना सुद्धा म्हणण्याचे असेल हारकर जितने वालों को बाजीगर कहते है…फक्त राहुल याला कंतारा सिनेमातून बाहेर येऊन बाजीगर व्हावे लागेल.
हा लेखही वाचा:
अधिक पाहा..
Comments are closed.